शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

एकमेकांचे खड्डे काढण्याऐवजी लोकांसाठी चांगले काम करा : कृषी आयुक्तांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:31 IST

चांगली शेती कशी करावी, हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे; परंतु हे करण्याऐवजी आपण एकमेकांसाठीच खड्डे काढत बसतो आणि त्यात पडतो; त्यामुळे चांगले काम करा, लोकांशी नीट वागा, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असा कानमंत्र राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देएकमेकांचे खड्डे काढण्याऐवजी लोकांसाठी चांगले काम करा कृषी आयुक्तांचा अधिकाऱ्यांना सल्ला

कोल्हापूर : चांगली शेती कशी करावी, हे सांगण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेतला पाहिजे; परंतु हे करण्याऐवजी आपण एकमेकांसाठीच खड्डे काढत बसतो आणि त्यात पडतो; त्यामुळे चांगले काम करा, लोकांशी नीट वागा, ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असा कानमंत्र राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित खरीप हंगाम-२०१९-२०च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती कृषी विभागीय सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदींची होती.ज्या ठिकाणी जे पिकते त्यावरच अधिकाऱ्यांनी जास्त काम करावे. गडहिंग्लज आणि चंदगडसारख्या तालुक्यांत काजू उत्पादन चांगले आहे. या ठिकाणी इतर व्यवसाय घेण्याऐवजी काजूलाच प्राधान्य दिले पाहिजे; त्यासाठी भविष्यात ‘मिशन काजू’ म्हणूनच काम केले पाहिजे. 

काजूमुळे तेथील शेती, शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येतील. याशिवाय, रोजगाराच्या चांगल्या संधीही उपलब्ध होतील. शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत बांबू शेतीला पाठबळ दिले पाहिजे. बांबूंसारखे पीक चांगले येऊ शकते. बाहेरील राज्यात एखादा प्रयोग केला असेल, तर तो आपणही अनुकरण करण्यास हरकत नाही. जे पीक ज्या तालुक्यात चांगले येते, तेच पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करा.

अधिकारी केवळ पदासाठी होऊ नका, तर गावागावांत आणि शेतापर्यंत आपले ज्ञान द्या, तसेच शेतीमध्ये अनेक प्रयोग करता येतात, त्याला नवतंत्रज्ञानाची जोड द्यावी. कायद्यावर बोट ठेवून एखादी लोकोपयोगी योजना परत पाठवू नका, तर कशा पद्धतीने ती योजना अंमलात आणता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा, असा सल्ला देत आपण कृषीमधून शिक्षण घेऊन अधिकारी होऊनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात नसेल, तर त्याचा काय उपयोग? अशी विचारणाही त्यांनी केली.

भीम बांबूचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करातमिळनाडूमध्ये ‘भीम’ बांबूचे पीक घेतले जाते. हे पीक चांगले आणि दर्जेदार असल्याने शेतकऱ्यांना याचा भरघोस फायदा होत आहे; त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे बांबू पीक आपल्या जिह्यात आणून शेतकऱ्यांना दाखविले व तंत्रशुद्ध मार्गदर्शन केल्यास येथील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. नाहीतर वरून उद्दिष्ट आले म्हणून ओढून ताणून ते करायचे हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे दिवसे यांनी सांगितले.

चुकीच्या पद्धतीने काम करू नकाशासनाच्या उद्दिष्टाप्रमाणे निधी संपवायचा आहे, म्हणून चुकीच्या पद्धतीने काम केल्यास कोणाचाही फायदा होणार नाही. शासनाचा निधी योग्य कामासाठी वापरला गेल्यास नक्कीच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो; त्यासाठी अधिकाऱ्यांनी आळस झटकून काम केले पाहिजे, असे सांगून आपल्या मुला-बाळांनाही आपले काम चांगले वाटले पाहिजे, अशा पद्धतीने नीट काम करा, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील ३३७ गावांत ‘शेती शाळा’ प्रकल्पकृषी विभागातर्फे यावर्षी जिल्ह्यातील ३३७ गावांत ‘शेती शाळा’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याचे काम कृषी साहाय्यक पाहणार आहेत. प्रत्येक गावात शेतामध्ये प्लॉट पाडून विविध प्रकारच्या सहा पिकांची लागवड केली जाणार आहे. असे कृषी आयुक्त दिवसे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर