शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पुढील दहा दिवस उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:46 IST

रांगोळ्यांनी रस्ते फुलले

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात आज, शनिवारी श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची परंपरेनुसार विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.आज पासून पुढील दहा दिवस उत्सव सुरु राहणार असून दत्त मंदिराच्या उत्तरबाजूस मंडप व शामियाना उभारण्यात आला आहे. आज पहाटे पाच वाजता मानकरी जनार्दन, सचिन, संदीप व पवन  कागलकर आणि परिवार या मानकरींच्या घरातून श्री कृष्णावेणीची सालंकृत मूर्ती वाद्य, गजरासह मिरवणुकीने उत्सव मंडपात आणण्यात आली.

घोडे, भालदार, चोपदार, दिवटी, छत्र चामर आणि वाद्यवृंदतसेच दुतर्फा ब्रम्हवृंद, घोडा आदी मिरवणूकीत सामील झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली. नृसिंहवाडी सह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची वेदशास्त्र संपन्न अवधूतशास्त्री बोरगावकर व दिलीप उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली नवल खोंबारे  यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. व जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करणेत आली. पूजेनंतर  ऋकसंहिता, ब्राम्हण, अरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णामहात्म्य, श्रीमद् भागवत, श्री सुक्त, रुद्र एकादशिनी, सप्तशती आदी पारायणास आरंभ झाला.

दुपारी नैवेद्य आरती झालेनंतर तीन वाजता एकविरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेद शास्त्र संपन्न हरी नारायण चोपदार यांचे पुराण सायंकाळी पाच वाजता प्रसाद शेवडे (देवगड) यांचे गान व रात्री 9.30 वाजता ह.भ.प.नंदकुमार कर्वे रा.पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले.रांगोळ्यांनी रस्ते फुललेसंस्कार भारती शाखा, नृसिंहवाडी व सोलापूर  यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळी व नयनरम्य गालीच्यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते विलोभनीय दिसत होते.उद्या दि.29 रोजी दुपारी 5 वाजता भाग्येश मराठे (मुंबई)यांचे गायन व रात्रो 9.30 वाजता ह.भ.प.नंदकुमार कर्वे रा.पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर