शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेची नाबार्डकडून तपासणी, ‘ईडी’ने तपासलेलेच मुद्दे केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:21 IST

गेली तीन दिवस नाबार्डच्या दोन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गेली तीन दिवस नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित असल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘ईडी’ ने तपासणी केलेल्या मुद्द्यांभोवतीच ही तपासणी केल्याचे समजते. यामध्ये बँकेने साखर कारखान्यांना केलेल्या कर्जपुरवठ्यावर ‘ईडी’ आक्षेप असल्याने त्यावर नाबार्डची नजर असून, नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस तपासणी केल्यानंतर बुधवारी ते मुंबईला रवाना झाले.जिल्हा बँकेने ब्रिक्स कंपनी व संताजी घोरपडे साखर कारखान्याला दिलेले कर्जाबाबत ईडीचा आक्षेप आहे. त्यांच्या तपासणीत काही मुद्दे समोर आले आहेत. ‘नाबार्ड’ व रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी तपासणी होते, शासकीय लेखापरीक्षण होते. या सगळ्यांच्या तपासणीत जे सापडले नाही ते ईडीला कसे सापडले, असा सवाल बँकेकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गेली तीन दिवस नाबार्डच्या दोन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.या कालावधीत त्यांनी विशेष म्हणजे ब्रिक्स कंपनी व संताजी घोरपडे साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत तपासणी केल्याचे समजते. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ज्या दिशेने तपासणी केली, त्यानुसारच त्यांनी तपासणी केल्याची माहिती समोर आली असून, तपासणी पूर्ण करून बुधवारी सायंकाळी हे अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.साखर कारखान्यांना केलेल्या कर्जपुरवठ्याबाबत ‘ईडी’ने नोंदवलेले आक्षेप, त्यावर न्यायालयात सुरू असलेला वाद-प्रतिवादाच्या पार्श्वभूमीवर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी केलेली तपासणी, महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक