शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू; २ हजार कोटी झाले होते खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:49 IST

खासगी रोपवाटिकेतून खरेदी केलेल्या तीन वर्षांतील रोपांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावपळ

समीर देशपांडेकोल्हापूर : याआधीच्या भाजप शिवसेना युतीच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी सुरू झाली असून, खासगी रोपवाटिकेतून खरेदी केलेल्या तीन वर्षांतील रोपांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत बहुतांशी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या असून, ही सर्व माहिती नियुक्त करण्यात आलेल्या विधानमंडळाच्या तदर्थ समितीस उपलब्ध करून देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम जाहीर केली होती. विविध शासकीय कार्यालयांना याबाबत उद्दिष्ट देऊन कामाला लावले होते. सलग तीन वर्षे हे वृक्षारोपण झाले. यासाठी अमिताभ बच्चन यांनाही सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने उद्दिष्ट देण्यात आल्याने अनेक शासकीय कार्यालयांनी केवळ वरून शासन आदेश आहे म्हणून दिसेल त्या जागेवर झाडे लावली होती. परंतु, त्यातील अनेक झाडे नंतर जगली की मेली हे पाहण्याचीही तसदी घेतली नाही.

परिणामी अनेक ठिकाणी केवळ कागदावर वृक्षारोपण झाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर याच विषयावरून विधानसभा अधिवेशनामध्ये गेल्यावर्षी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार विधिमंडळाची १६ सदस्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. याबाबत वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत घोषणा केली होती. आता या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून, यातील पहिला टप्पा म्हणून शासकीय रोपवाटिकांमधून आणि खासगी रोपवाटिकांमधून किती रोपे खरेदी केली याची माहिती मागवली आहे.

२ हजार ४२९ कोटी रुपये खर्च झाले होते

या योजनेतून राज्यभरात २ हजार ४२९ कोटीे रुपये खर्च झाले होते. मार्च २१ मध्ये ही चौकशी समिती जाहीर करण्यात आली होती आणि ही समिती सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करणार होती. परंतु, वर्ष उलटून गेले तरी माहिती गोळा करण्याचेच काम सुरू आहे. यातील वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी केलेल्या वृक्षलागवडीची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला आहे. आता शासनाच्या विविध विभागांनी केलेल्या लागवडीची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforest departmentवनविभाग