शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

क्रीडा विभागातील ढिसाळ कारभाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 10:49 IST

संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा’, ‘झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?’, ‘खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे फलक हातांमध्ये घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची निदर्शने

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई क रावी, अशी मागणी करीत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने गुरुवारी मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये याबाबत सदस्यांनी आवाज उठवावा, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. कृती समितीच्या वतीने ‘संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा’, ‘झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?’, ‘खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे फलक हातांमध्ये घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.

अशोक पोवार म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभागाच्या कारभाराची अधिसभेमध्ये चर्चा व्हावी, क्रीडा विभागाची ढासळलेली गुणवत्ता पुन्हा उंचावण्यासाठी विभागात तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक, दर्जेदार क्रीडासाहित्य, क्रीडांगण व प्रशिक्षक मिळावेत, यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे.

रमेश मोरे म्हणाले, क्रीडा विभागाच्या व्यथेबाबत प्रशासनासोबत कृती समितीने चर्चा केली आहे. संबंधित घटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सिनेट सभासदांची आम्ही भेट घेऊन त्यांना क्रीडा विभागातील कारभाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

यावेळी खेळाडू पृथ्वीराज शिंदे, अक्षय वाळके, अखिल मोरे, राजू मालेकर, दीपक गौड, उत्तम वंदुरे, मानसिंग पाटील, चंद्रकांत बराळे, संभाजी जगदाळे, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे, रामभाऊ कोलेकर, प्रदीप मोरे, शुभम मुळेकर, अमर ढेरे, करण खाडे, आदिनाथ गौड, प्रसाद पाटील, अक्षय खरबडे, अनिकेत कोर्इंगडे, सुशांत पाटील, चंचल देशपांडे, सुरेश पाटील, अंजुम देसाई, साहील मुजावर, आदी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ