शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Kolhapur : भरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:38 IST

Gokul Milk Kolhapur : गोकुळमध्ये मागील तीन-चार वर्षात भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दात अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. वारणा,राजारामबापू दूध संघापेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.

ठळक मुद्देभरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करागोकुळच्या आढावा बैठकीत नेत्यांचे आदेश

कोल्हापूर : गोकुळमध्ये मागील तीन-चार वर्षात भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दात अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. वारणा,राजारामबापू दूध संघापेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.गोकुळमध्ये सत्तांतर होऊन एक महिना तीन दिवस झाल्यानंतर राजर्षि शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी अमृतकलश पूजन निमित्ताने दूध प्रकल्प कार्यालयात आढावा बैठक घेतली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीपुर्वी अधिकाऱ्यांना प्रश्नावली दिली होती, त्या माहीतीनुसार संघाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर सादरीकरण केले.सध्याचे दूध संकलन, अस्थापनासह इतर बाबींवर होणारा खर्च, संघामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजना, दूध वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व त्यावरील खर्च संघाची सध्याची आर्थिक स्थिती आदी बाबींची माहीती कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी संघातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले.बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक, आमदार विनय कोरो, राजेश पाटील, प्रकाश आबीटकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजू आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, सुजीत मिणचेकर, ह्यगोकुळह्णचे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर