सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी केलेल्या गैरकारभारामुळे कारखान्यावर प्रशासक नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कारभाराची चौकशी करावी व त्याचा खुलासा आठ दिवसांत व्हावा, अशी मागणी आमदार प्रकाशराव आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या शिष्टमंडळाने प्रशासक अरुण काकडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.कारखान्याच्या अर्थिक स्थितीचा अहवाल, किती कर्जे आहेत. कारखान्याने किती रकमा देणे व कंत्राटी कामावर किती खर्च झाला. कारखान्याने अपात्र सभासद दाव्याकामी सुप्रीम कोर्टात किती खर्च झाला, सहवीज प्रकल्पाची मूळ किंमत, वाढीव किंमत व प्रकल्पावर खर्च किती?, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या जमाखर्चाच्या माहितीची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सहवीज प्रकल्प मॉडिफिकेशन मंजूर झाला. मग चालूवर्षी नवीन मिल, कट्युअसपॅन व इतर आधुनिकीकरण कार्ड प्रकल्पाबाबत थर्ड पार्टीकडून आर्थिक व तांत्रिक मुल्यमापन करून द्यावे, असे साखर आयुक्त यांनी १३/१/२०१४ रोजी कळविले ते अद्याप का केले नाही? आॅडिटमध्ये को-जन प्रकल्पाचे आर्थिक फेर मूल्यांकन केल्याखेरीज झालेला खर्च योग्य झाला असे म्हणता येणार नाही? तर स्टोअर मालाची अनावश्यक खरेदी माल पुन्हा खरेदी केला आहे. मे. स्पुरिचअल कं. पुणे यांच्याकडून कारखान्याने कोणता माल खरेदी केला व ही कंपनी आर. सी. बुकात नोंद आहे काय?आधुनिकीकरणामुळे गाळप क्षमता फक्त ३०० टनांनी वाढली आहे. त्यासाठी १५० कोटी खर्च झालेला आहे. तर साखर उत्पादकांमध्ये एम. ग्रेड साखर कमी होते, त्याचा साखर दरावर परिणाम होत आहे. तर कारखाना व्यवस्थापनाने लागण अगर खोडवा करार नोंद चुकीच्या पद्धतीने केल्याने तोडणी पाळीपत्रकामध्ये प्रचंड राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे. तर कारखान्याने शेतकरी मंडळे स्थापन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पहिजे, असेही नमूद केले. अनावश्यक कंत्राटी कामगार बंद करावेत, कामचुकार कर्मचाऱ्यांना शिक्षा व्हावी, विना मंजुरी चुकीची नोकर भरती रद्द व्हावी, अशी मागणी केली आहे.अपात्र सभासदांच्या सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये कारखान्याने चुकीचा दावा दाखल केला आहे. याबाबत आपल्याकडून योग्य अहवाल मिळावा. यावेळी बाबासाहेब पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, सत्यजित जाधव, भूषण पाटील, बाबूराव देसाई, नंदकुमार दैगे, कल्याणराव निकम, धनाजी खोत उपस्थित होते. (प्रतिनिधी)कारखान्याच्या कर्ज व आर्थिक स्थितीचा अहवाल द्या.कंत्राटी कामावर किती खर्च झाला? कारखान्याने अपात्र सभासद दाव्याकामी सुप्रीम कोर्टात किती खर्च झाला?सहवीज प्रकल्पावर खर्च किती?
‘बिद्री’च्या गैरकारभाराची चौकशी करा
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST