शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वनअधिकाऱ्यांकडून वृक्षप्रेमींवर अन्याय, निसर्गमित्रकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 20:32 IST

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाºयांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य उचकटून जप्त केले. त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे, या अन्यायाचा निसर्ग मित्र संस्थेने निषेध केला आहे.

ठळक मुद्देवनअधिकाऱ्यांकडून वृक्षप्रेमींवर अन्याय, निसर्गमित्रकडून निषेधदिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाऱ्यांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य उचकटून जप्त केले. त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे, या अन्यायाचा निसर्ग मित्र संस्थेने निषेध केला आहे.पोर्ले गावाशेजारी वनविभागाच्या २५ एकर ओसाड जमिनीवर सात ते आठ वर्षात त्यांच्या संमतीनेच दिनकर चौगुले यांनी दहा हजार देशी वृक्षांची लागवड करुन वनराई (जंगल) तयार केले. तसेच ७0 हजार रुपये खर्च करुन अडीच लाख लीटर क्षमतेचे वनतळे तयार केले. परंतु परिसरातील कांही विघ्नसंतोषी लोकांनी तीनचार वर्षापासून वनराईला आग लावणे, ठिबकच्या पाईप तोडणे, जाळणे असे प्रकार सुरु केले. वनराईमुळे गुरे, शेळ्या-मेंढ्या चरण्याची जागा कमी झाल्यामुळे तिरस्काराने हा प्रकार या लोकांनी केला. याबाबत वेळोवेळी तक्रार केल्याने लोकांनी नासधूस केली.वन खात्याकडे वारंवार तक्रार करतात म्हणून वनकर्मचाऱ्यांकडूनच त्यांना मारहाण केली. तसेच वनराईतील साहित्याचे नुकसान केले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही शहानिशा न करता चौगुले यांच्यावरच कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. या प्रकाराचा निसर्गमित्र संस्थेने निषेध केला आहे. निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक सुरेश शिपूरकर, संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, कार्यवाह अनिल चौगुले आदींनी या घटनेचा निषेध केला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर