लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून वादावादी होऊन लोखंडी वस्तू डोक्यात मारल्याने नीलेश प्रकाश गुरव (वय ३३, रा. वसंतऋतू कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा) हे जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री उशिरा कसबा बावड्यात शिवशक्ती कॉलनीत घडली. याबाबत श्रावण बुचडे (रा. शिवशक्ती कॉलनी, कसबा बावडा) याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्ह नोंद झाला आहे.
कोपार्डेत दाम्पत्याला मारहाण
कोल्हापूर : कोपार्डे (ता. करवीर) येथे गोठ्यात जनावरे बांधताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दाम्पत्याला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. सिद्धी पाटील व विकास पाटील (दोघेही रा. कोपार्डे) असे या जखमी दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संदीप पाटील, बदाम पाटील, सावित्री पाटील (सर्व रा. कोपार्डे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकी चोरी
कोल्हापूर : पाचगाव मेन रोडवरील समर्थ संकुल अपार्टमेंटसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना सोमवारी घडली. याबाबत धनंजय शामराव मेथे (वय ४३, रा. तपोवन शाळेनजीक, कळंबा रोड. मूळ रा. न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार बुधवारी रात्री दिली.