शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Navratri -उपवासाच्या साहित्याची आवक, खरेदीला बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:01 IST

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे.

ठळक मुद्देउपवासाच्या साहित्याची आवकखरेदीला बाजारपेठेत गर्दी

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे.स्त्रीशक्तीच्या आराधनेचा कालावधी असलेल्या नवरात्रौत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषदेखील नऊ दिवस उपवास करतात, व्रतस्थ राहतात. काहीजण एकवेळ जेवून तर काहीजण दोन्ही वेळ केवळ फळे किंवा उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे सध्या बाजारपेठेत साबूदाणा, शेंगदाणे, शेंगाड्याचे पीठ, वरीचे तांदूळ, खजूर, विविध प्रकारची फळे अशा साहित्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट, टिंबर मार्केट, बाजारगेट अशा बाजारपेठांमध्ये दुकानदारांनी उपवासाच्या पदार्थांची मांडणी केली आहे. सध्या लोकांना बाजारपेठेत जाऊन साहित्य खरेदी करण्याइतका वेळ नाही; त्यामुळे शहर व उपनगरांतील रस्त्यांच्या कडेला, चौकाचौकांमध्ये गाड्यांवर फळांची मांडणी करून व्यावसायिक उभे आहेत.मंदीमुळे दर स्थिरमंदी आणि श्रावणात आलेला महापूर यांमुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत उपवासाचे साहित्यच नव्हे तर सर्व प्रकारच्या धान्यांचे दर स्थिर आहेत. साहित्याला मागणी वाढली की त्याचे दर वाढतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र सण-उत्सवांचा कालावधी असला तरी नागरिकांकडून साहित्याच्या खरेदीला म्हणावा तितका अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे दर स्थिर असल्याचे व्यावसायिक प्रवीण नष्टे यांनी सांगितले.‘रेडी टू कुक’ पदार्थांना मागणीसध्या बहुतांश महिला नोकरदार असल्याने उपवासाच्या भाजणीचे पीठ बनविण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे साबूदाण्याचे, पीठ, वरीचे पीठ, शेंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, उपवासाची भाजणी, थालीपीठाचे पीठ अशा ‘रेडी टू कुक’ पदार्थांना महिला वर्गाकडून अधिक मागणी आहे. याशिवाय तयार बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, बटाटा चिवडा, साबू चिवडा या तयार पदार्थांनी घराघरांत स्थान मिळविले आहे.साहित्याचे दर असे (रु. प्रतिकिलो)

  • साबूदाणा : ८४ रुपये
  • वरीचे तांदूळ : १०८
  • शेंगदाणे : १२०
  • खजूर : १४०
  • रताळे : ६०
  • भुईमुगाच्या शेंगा : ८०.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर