गोकुळ शिरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:59+5:302021-09-19T04:23:59+5:30

गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगावात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने लहान बालकांसह नागरिकांनाही रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ...

Infestation of stray dogs in Gokul Shirgaon | गोकुळ शिरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

गोकुळ शिरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

Next

गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगावात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने लहान बालकांसह नागरिकांनाही रस्त्यावर फिरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्वल राजेंद्र सुतार या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यात प्रज्वल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोकुळ शिरगाव ते कणेरी फाटा महामार्ग सेवा रस्त्यालगत मांसाहाराची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या दुकानांभोवती या कुत्र्यांचा सतत वावर असतो. सेवा मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार-पादचाऱ्यांचा ही कुत्री पाठलाग करतात. यात कुत्र्याच्या भीतीमुळे दुचाकी सुसाट वेगाने नेल्यामुळे अनेकजण दुचाकीवरून पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणे प्रवासी टाळत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

चौकट : कुत्र्याच्या भीतीने कारखान्यातच मुक्काम

गोकुळ शिरगावसह येथील उपनगरात ग्रामपंचायत रोड, नवारस्ता तसेच चव्हाण गल्ली व म्हसोबा माळवाडी या ठिकाणी रोज भटक्या कुत्र्यांचे कळप दिसून येतात. या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे रात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. कुत्र्याच्या भीतीमुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार रात्रपाळी संपल्यानंतरही घरी न येता कारखान्यातच राहणे पसंत करत आहेत.

चौकट : ग्रामपंचायत लक्ष देईना

गोकुळ शिरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांनी यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांना सतत भीतीच्या छायेत वावरावे लागत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या कळपामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना धोका असून, ग्रामस्थांना पहाटे फिरायला जाण्यासाठी अडथळा होत आहे.

कोट : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लवकरच उपाय करून योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

महादेव पाटील, लोकनियुक्त सरपंच,

गोकुळ शिरगाव.

Web Title: Infestation of stray dogs in Gokul Shirgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.