शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा, जेल परिसर "सील डाऊन" 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:07 IST

सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देकुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधाकॅम्प पोलीस स्टेशन आणि हिंडलगा जेल परिसर "सील डाऊन" 

बेळगांव - सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामूळे कॅम्प पोलीस स्टेशन आणि हिंडलगा जेल परिसर "सील डाऊन"  पोलीस कर्मचारी क्वारंटाइन होण्याची शक्यता आहे.हिंडलगा रोडवरील समृद्धी ज्वेलर्स या सराफी दुकानातील सोन्याची चेन बंदुकीचा धाक दाखवून लंपास केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसापूर्वी कॅम्प पोलीसांनी एका कुविख्यात दरोडेखोराला गजाआड केले आहे. तथापि आता सदर दरोडेखोराला कोरोनाची बाधा झालीआहे. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक आणि हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भितीचे वातावरण पसरले आहे.त्याचप्रमाणे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही मानसिक दडपण आले आहे. कारण ज्यावेळी संबंधित दरोडेखोराला अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी तसेच खडेबाजार आणि कॅम्प पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्गाने मुद्देमालासह आरोपी समवेत प्रसारमाध्यमांसाठी फोटोसेशन केले होते.गजाआड करण्यात आलेल्या दरोडेखोराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत. कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृह परिसर सील डाऊन केला जाण्याची शक्यता आहे त्याची तयारी देखील सुरू झाली आहे.

हिंडलगा कारागृहात सध्या सुमारे ८३० कैदी आहेत. या कैद्यांना विभागून ठेवण्यात येत असले तरी संबंधित दरोडेखोर कोरोनाबाधित असण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे कारागृहातील पोलीस कर्मचारी व कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.हिंडलगा रोडवरील समृद्धी ज्वेलर्स या सराफी दुकानात गेल्या २७ जून रोजी एका व्यक्तीने सोन्याची चेन पाहण्याच्या निमित्ताने प्रवेश केला होता त्यानंतर त्याने सोन्याची चेन दाखविणार्‍या दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवून सुमारे तीन लाख रुपये किंमतीची ती सोन्याची चेन मोटरसायकलवरून लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्या दरोडेखोराला अटक करून त्याच्याकडील सोन्याची चेन, एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक