शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा स्पोर्टस्कडून बडोदाचा धुव्वा : कोल्हापूर छत्रपती शाहू स्टेडियमवरइंडियन वूमेन्स फुटबॉल लीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:33 IST

कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फरकाने मात

ठळक मुद्देदुसºया सामन्यात सेतू क्लबची जे अँड के स्पोर्टस्वर मातसामन्यात संध्या रंगनाथनने आठ गोल केले. बडोदा संघाकडून कोल्हापुरातील पृथ्वी गायकवाड, मृदुल शिंदे, असावरी हवालदार, प्रतीक्षा मिठारी यांचा सहभाग

कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फरकाने मात केली. तर सेतू फुटबॉल क्लब (मदुराई)ने जे अँड के. स्पोर्टस् कौन्सिल (जम्मू-काश्मीर) संघावर २-० अशा गोल फरकाने मात केली.

इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) विरुध्द बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) यांच्यामध्ये सामना झाला. संपूर्ण वेळ सामन्यात पाँडेचरी संघाने वर्चस्व राखले. यामध्ये सामन्यातील सातव्या मिनिटाला संध्या रंगनाथनने गोल करत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ ९व्या मिनिटाला संध्याने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल केला. पाठोपाठ १९ व्या मिनिटाला प्रदिपा सेकरने, २९ व्या मिनिटाला संध्याने वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल केला. ३७ व्या मिनिटाला पुन्हा संध्याने संघासाठी पाचवा गोल केला. तर प्रदीपाने ४२ व्या मिनिटाला गोल करत संघाचा सहावा गोल केला. मध्यंतरापर्यंत पाँडेचरी संघ ६-० अशा गोल फरकाने आघाडीवर होता.उत्तरार्धातही पाँडेचरी संघाने वर्चस्व राखले. ५१व्या मिनिटाला प्रदीपा सेकरने वैयक्तिक तिसरा व संघाचा सातवा गोल केला. पाठोपाठ संध्याने ५३व्या, ५८व्या मिनिटाला गोल करत सामन्यात ९-० अशी भक्कम आघाडी घेतली. ६२व्या मिनिटाला प्रदीपाने गोल केला. ६३ व्या मिनिटाला सुरेखा सुरेशने गोल करत सामन्यात ११-० अशा गोल फरकाने आघाडी केली. ७५ व्या मिनिटाला प्रदीपा साकरने, ८१ व्या मिनिटाला संध्या रंगनाथने, ८३ व्या मिनिटाला प्रदीपाने तर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला संध्याने गोल करत सामन्यात १५-० अशा गोल फरकाने विजय मिळविला. सामन्यात संध्या रंगनाथनने आठ गोल केले. बडोदा संघाकडून कोल्हापुरातील पृथ्वी गायकवाड, मृदुल शिंदे, असावरी हवालदार, प्रतीक्षा मिठारी यांचा सहभाग होता. घरचेच मैदान असल्याने त्यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले.दरम्यान, झालेल्या सामन्यात सेतू फुटबॉल क्लब (मदुराई)ने जे अ‍ॅन्ड के. स्पोर्टस् कौन्सिल (जम्मू काश्मीर) संघावर २-० अशा गोल फरकाने मात केली. दोन्ही संघांनी प्रारंभी बचावात्मक खेळी केली. सामन्याच्या २९व्या मिनिटाला सेतू संघाकडून मनीषने गोल करत सामन्यात १-० अशा गोलफरकाने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. ७८ व्या मिनिटाला सेतू संघाकडून के नंदिनी गोल करत सामन्यात २ -० अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. जम्मू संघाकडून तारा खतून, कुंतीकुमार लकर, ज्योती आणि पुष्पा यांनी चांगला खेळ केला.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचरी) संघ व बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.आजचे सामनेयुनायडेट वॉरीयर्स (पंजाब) वि. हंस फुटबॉल क्लब (दिल्ली) वेळ : सकाळी ८.३० वा.चांदणी स्पोर्टस् क्लब (वेस्ट बंगाल) वि. साई फुटबॉल क्लब वेळ : दुपारी १२. वा.मणिपूर वि. इंडिया सॉकर (महाराष्ट्र), वेळ : दुपारी ३.३० वा

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर