इंदिरा स्पोर्टस्कडून बडोदाचा धुव्वा : कोल्हापूर छत्रपती शाहू स्टेडियमवरइंडियन वूमेन्स फुटबॉल लीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:31 PM2017-11-27T23:31:56+5:302017-11-27T23:33:59+5:30
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फरकाने मात
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फरकाने मात केली. तर सेतू फुटबॉल क्लब (मदुराई)ने जे अँड के. स्पोर्टस् कौन्सिल (जम्मू-काश्मीर) संघावर २-० अशा गोल फरकाने मात केली.
इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) विरुध्द बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) यांच्यामध्ये सामना झाला. संपूर्ण वेळ सामन्यात पाँडेचरी संघाने वर्चस्व राखले. यामध्ये सामन्यातील सातव्या मिनिटाला संध्या रंगनाथनने गोल करत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ ९व्या मिनिटाला संध्याने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल केला. पाठोपाठ १९ व्या मिनिटाला प्रदिपा सेकरने, २९ व्या मिनिटाला संध्याने वैयक्तिक तिसरा व संघाचा चौथा गोल केला. ३७ व्या मिनिटाला पुन्हा संध्याने संघासाठी पाचवा गोल केला. तर प्रदीपाने ४२ व्या मिनिटाला गोल करत संघाचा सहावा गोल केला. मध्यंतरापर्यंत पाँडेचरी संघ ६-० अशा गोल फरकाने आघाडीवर होता.
उत्तरार्धातही पाँडेचरी संघाने वर्चस्व राखले. ५१व्या मिनिटाला प्रदीपा सेकरने वैयक्तिक तिसरा व संघाचा सातवा गोल केला. पाठोपाठ संध्याने ५३व्या, ५८व्या मिनिटाला गोल करत सामन्यात ९-० अशी भक्कम आघाडी घेतली. ६२व्या मिनिटाला प्रदीपाने गोल केला. ६३ व्या मिनिटाला सुरेखा सुरेशने गोल करत सामन्यात ११-० अशा गोल फरकाने आघाडी केली. ७५ व्या मिनिटाला प्रदीपा साकरने, ८१ व्या मिनिटाला संध्या रंगनाथने, ८३ व्या मिनिटाला प्रदीपाने तर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला संध्याने गोल करत सामन्यात १५-० अशा गोल फरकाने विजय मिळविला. सामन्यात संध्या रंगनाथनने आठ गोल केले. बडोदा संघाकडून कोल्हापुरातील पृथ्वी गायकवाड, मृदुल शिंदे, असावरी हवालदार, प्रतीक्षा मिठारी यांचा सहभाग होता. घरचेच मैदान असल्याने त्यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले.
दरम्यान, झालेल्या सामन्यात सेतू फुटबॉल क्लब (मदुराई)ने जे अॅन्ड के. स्पोर्टस् कौन्सिल (जम्मू काश्मीर) संघावर २-० अशा गोल फरकाने मात केली. दोन्ही संघांनी प्रारंभी बचावात्मक खेळी केली. सामन्याच्या २९व्या मिनिटाला सेतू संघाकडून मनीषने गोल करत सामन्यात १-० अशा गोलफरकाने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. ७८ व्या मिनिटाला सेतू संघाकडून के नंदिनी गोल करत सामन्यात २ -० अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. जम्मू संघाकडून तारा खतून, कुंतीकुमार लकर, ज्योती आणि पुष्पा यांनी चांगला खेळ केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचरी) संघ व बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.
आजचे सामने
युनायडेट वॉरीयर्स (पंजाब) वि. हंस फुटबॉल क्लब (दिल्ली) वेळ : सकाळी ८.३० वा.
चांदणी स्पोर्टस् क्लब (वेस्ट बंगाल) वि. साई फुटबॉल क्लब वेळ : दुपारी १२. वा.
मणिपूर वि. इंडिया सॉकर (महाराष्ट्र), वेळ : दुपारी ३.३० वा