शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-भारतीय पथकाकडून इराणमधील पर्यटकांची वैद्यकीय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:59 IST

इराणमध्ये अडकलेल्या कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील ४४ पर्यटकांच्या वैद्यकीय तपासणी गुरुवारी रात्री भारतातून दाखल झालेल्या पथकांकडून करण्यात आली, अशी माहिती सहल आयोजक मुन्ना सय्यद यांनी दिली. हे पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून त्यांना काही दिवस विशेष निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

ठळक मुद्देभारतीय पथकाकडून इराणमधील पर्यटकांची वैद्यकीय तपासणीदेशात आल्यानंतर विशेष निगारणीखाली ठेवणार; दिल्ली, मुंबईत स्वतंत्र व्यवस्था

कोल्हापूर : इराणमध्ये अडकलेल्या कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील ४४ पर्यटकांच्या वैद्यकीय तपासणी गुरुवारी रात्री भारतातून दाखल झालेल्या पथकांकडून करण्यात आली, अशी माहिती सहल आयोजक मुन्ना सय्यद यांनी दिली. हे पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून त्यांना काही दिवस विशेष निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.या पर्यटकांची कोरोना विषाणू भीतीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी केली जाणार होती. त्यासाठी भारतातून वैद्यकीय पथक गुरुवारी दुपारी इराणमध्ये दाखल झाले. तेथील भारतीय वकिलातीमधील हेड आॅफ द कौन्सुलेट आकाश वानखेडे यांनी आम्हाला या पथकाबाबतची माहिती दिली. त्यासह या पर्यटकांना वैद्यकीय तपासणीला नेण्यासाठी तुमच्या हॉटेल येथे सात वाजता बस पाठविण्यात येईल, असे दूरध्वनीवरून सांगितले.

या तपासणीनंतर भारतात जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर आम्ही तेथून निघण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. दरम्यान, हे पर्यटक भारतात आल्यानंतर देखील त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांना त्वरित घरी पाठविले जाणार नाही. मुंबई, दिल्ली येथे त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. विशेष निगारणीखाली त्यांना काही दिवस ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरtourismपर्यटन