शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'भारत- रोम' व्यापारी संबंध; कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील 'या' आठ वस्तू गेल्या सातासमुद्रापार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 12:05 IST

कोल्हापुरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तूंमुळे पुन्हा समोर आला

दुर्वा दळवीकोल्हापूर: उत्खनन करताना ज्या वस्तू सापडतात त्यावरून इतिहासातील अनेक बाबी प्रकाश झोतात येतात. सातासमुद्रापार पार असणाऱ्या देशांशी महाराष्ट्रातील कोल्हापूरचा व्यापारी संबंध होता याचे पुरावे देणाऱ्या वस्तू ब्रह्मपुरी टेकडीवरील सन १९४५ - १९४६ साली करण्यात आलेल्या उत्खननात आढळलेल्या होत्या. त्यातील आठ महत्त्वाच्या वस्तू टाऊन हॉल संग्रहालयात असून त्या आता थेट न्यूयॉर्क-कोरियाला प्रदर्शनाकरिता पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या सहयोगाने दिल्ली नॅशनल म्युझियम यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरातील टाऊन हॉल संग्रहालयातील आठ वस्तू नेण्यात आल्या आहेत. 'अर्ली बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया' या विशेष प्रदर्शनाकरिता या वस्तू लोन तत्वावर करार करून सातासमुद्रापार नेण्यात आल्या आहेत. कोल्हापुरचा ग्रीक आणि रोम या देशांशी असणारा इतिहासातील व्यापारी संबंध या वस्तूंमुळे पुन्हा समोर आला आहे. न्यूयॉर्कच्या मेट म्युझियममध्ये या आठ वस्तू प्रदर्शनाकरिता १७ जुलै २०२३ ते १३ नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वस्तू उत्तर कोरियातील नॅशनल म्युझियममध्ये २२ डिसेंबर २०२३ ते १४ एप्रिल २०२४ पर्यंत प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचा कालावधी संपल्यावर पुन्हा ह्या वस्तू कोल्हापुरात येणार आहेत. 

या आठ वस्तू कोल्हापुरातून परदेशात गेल्यासहा इंचाची ग्रीक समुद्रदेवतेची अर्थात 'पोसायडमन'ची पंचधातूची मूर्ती, खेळण्यातील धातूची बैलगाडी, हत्तीवरील स्वार, जैनधर्मीयांची संकेत चिन्हे, वॉटर व्हेसल पॉट, रोमन पदक, मेटल रिंग या आठ प्रकारच्या कलावस्तू कोल्हापुरातून पहिल्यांदाच भारताबाहेर गेल्या आहेत. ज्या न्यूयॉर्क येथील प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या ज्या आता कोरियात नेण्यात आल्या आहेत. 

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्टइसवी सन पूर्व काळात कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा थेट रोमन आणि ग्रीक राष्ट्रांशी व्यापारी संबंध होता हे या वस्तूंवरून अधोरेखित होते. कोल्हापुरातील अनमोल ठेवा सातासमुद्रापार जाणे ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. - उदय सुर्वे, सहायक अभिरक्षक, टाऊन हॉल संग्रहालय

टॅग्स :kolhapurकोल्हापूर