शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारत राखीव बटालियनच्या जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:25 IST

कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देभारत राखीव बटालियनच्या जवानाची आत्महत्यासेवेतून निलंबित केल्याचे कारण : नागपूर ग्रामीण येथील घटना

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.अधिक माहिती अशी, जवान सुशील भेंडे हे २०१३ मध्ये भारत राखीव बटालियन-३ मध्ये भरती झाले. सहा वर्षे त्यांनी सेवा बजावली. भारत राखीव बटालियनचे मुख्य कार्यालय कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात आहे. या बटालियनचे जवान दौंड येथे असतात. या ठिकाणी सेवेत असताना सुशील भेंडे याची एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वादावादी झाली.

१0 दिवसांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती; त्यामुळे तो गावी येऊन राहिला होता. जादा ड्यूटी लावल्याच्या तणावातून त्याची अधिकाऱ्याशी वादावादी झाली होती. निलंबित केल्याने त्याची मानसिकता ढासळली होती. घरीदेखील तो मानसिक तणावाखाली होता.

जास्त कोणाशी बोलत नव्हता. सोमवारी सकाळी त्याने शेतामध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त राज्यभर पसरताच राखीव बटालियनच्या जवानांमध्ये खळबळ उडाली. सुशील यांचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. कोल्हापुरातील जवानांतून हळहळ व्यक्तकेली जात आहे.जवानांना न्याय द्यावा,भारत राखीव बटालियनच्या जाचक अटी व त्रासाबद्दल कोणी बोलले, तर त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करून प्रसंगी नोकरी गमवावी लागते. या जवानांची नोकरी २४ तास आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार शासन करीत नाही. जिल्हा बदली १५ वर्षांनी केली आहे. ती १0 वर्षांनी करावी, म्हणून जवान शासनदरबारी न्याय मागत आहेत. कामाच्या अतिरिक्ततणावामुळे अनेक जवानांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर काहींनी प्रयत्न केला आहे. त्याचाच सुशील भेंडे बळी आहे. शासनाने या जवानांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जवानांतून होत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर