शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भारत-पाकिस्तान छुपं युद्ध, पैशाच्या जोरावर न्यायदेवता विकत मिळंल; बाळूमामा देवालयात भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:06 IST

कृष्णात डोणे-वाघापूरकर यांची भाकणूक

बाजीराव जठार

वाघापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा देवालयात जागरानिमित्त पहाटे झालेल्या भाकणूककार कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक परिस्थितीवर भाष्य केलं. 

अशी झाली भाकणूक... 

जगातील राष्ट्रे लढाई करतील, तिसरं महायुद्ध होईल,युद्धाचा भडका उडेल, भारत पाकिस्तान यांचं छुपं युद्ध होईल,चीन राष्ट्र भारतावर आक्रमक करील, भारतीय सैनिक त्यांना परतून लावतील. तिरंगा झेंडा आनंदात राहील.

कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल,दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकंल. ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व  दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही. 

चालता बोलता मनुष्याला मरण येईल,माझं माझं म्हणू नका,माणसाला माणूस खाऊन टाकील,येतील येतील लाकडाची डोरली येतील,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल,येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल, गर्वाने वागू नका.

गर्वाचे घर खालीच होईल, होईल होईल भुकूंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल,बारा बाजार मोडून एक बाजार होईल,समुद्रातील संपत्तीचा नाश होईल, आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल,  बाळूमामांची करशिला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन. यावेळी भाकणुकीस बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं