शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

जीएसटीविरोधात २६ फेब्रुवारी रोजी कॅटकडून भारत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:01 IST

GST Kolhapur- वस्तू व सेवाकर (जीएसटी) विरोधात दि. २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद आणि देशव्यापी चक्का जाम करण्याची घोषणा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) राष्ट्रीय व्यापार संमेलनात नागपूर येथे झाली. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी संयुक्तपणे या आंदोलनाची घोषणा केली.

ठळक मुद्देजीएसटीविरोधात २६ फेब्रुवारी रोजी कॅटकडून भारत बंदकोल्हापूर चेंबरच्यावतीने संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) विरोधात दि. २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद आणि देशव्यापी चक्का जाम करण्याची घोषणा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) राष्ट्रीय व्यापार संमेलनात नागपूर येथे झाली. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी संयुक्तपणे या आंदोलनाची घोषणा केली.या संमेलनास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, प्रशांत शिंदे, विजय नारायणपुरे उपस्थित होते. भारतीया आणि खंडेलवाल यांनी जीएसटी कौन्सिलच्या फायद्यासाठी जीएसटीचे स्वरूप विकृत केल्याचा आरोप केला. जीएसटीच्या सद्यस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

गेल्या चार वर्षांत ९३७ हून अधिक दुरुस्तीनंतर जीएसटीची मूलभूत रचना बदलली आहे. वारंवार आवाहन करूनही जीएसटी कौन्सिलने अद्याप कॅटने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेतली नाही. त्यामुळेच देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत आपले मत पोहोचवण्यासाठी कॅटने या आंदोलनाची घोषणा केली असल्याचे भारतीया आणि खंडेलवाल यांनी सांगितले.

त्याला पाठिंबा दर्शवित ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देशव्यापी चक्काजामची घोषणा केली. या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि त्यांच्या संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर चेंबरच्यावतीने अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.

टॅग्स :GSTजीएसटीkolhapurकोल्हापूर