शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:45 IST

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे निवेदन

कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची रचना व आर्थिक तरतुदीबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यरत करू, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक, ठाणे येथील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्री फुंडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी ते बोलत होते.वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मागील सरकारच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. कल्याणकारी मंडळाद्वारे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी पेन्शन, व्यवसायासाठी मदत, साधनसामग्रीची पुरवठा, आरोग्य सुविधा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या उच्चशिक्षणासाठी योजना लागू कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर