शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठ आंदोलनास वाढता पाठिंबा, माजी सचिवांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:28 IST

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशी सुरूच राहिले. यात बार असोसिएशनच्या माजी सचिवांनी दिवसभर झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. भागीरथी महिला संघटनेच्या अरुंधती महाडिक यांच्यासह विविध संघटना व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी पत्र देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

ठळक मुद्देखंडपीठ आंदोलनास वाढता पाठिंबा, माजी सचिवांचा सहभाग जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांचा आंदोलनास पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशी सुरूच राहिले. यात बार असोसिएशनच्या माजी सचिवांनी दिवसभर झालेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. भागीरथी महिला संघटनेच्या अरुंधती महाडिक यांच्यासह विविध संघटना व जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी पत्र देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.कोल्हापुरासह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांसाठी ‘कोल्हापूर’ हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खंडपीठ मिळावे, या मागणीसाठी गेल्या ३० वर्षांपासून वकील संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. यासाठीच सहा जिल्ह्यांतील वकिलांनी आंदोलन पुकारले आहे. यात २५ मार्च ते १ एप्रिल असे सात दिवस कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बार असोसिएशनच्या आतापर्यंतच्या सर्व माजी सचिवांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात असोसिएशनचे माजी सचिव अ‍ॅड ए. एस. देसाई, अरुण पाटील, शिवराम जोशी, प्रशांत देसाई, सुधीर चव्हाण, सतीश खोतलांडे, सर्जेराव खोत, रवींद्र जानकर, इंदिरा राजेपांढरे, राजेंद्र मंडलिक, पिराजी भावके, पीटर बारदेस्कर, किरण महाजन, व्ही. आर. पाटील, श्रीकांत साळोखे यांनी सहभाग घेतला. यावेळी पी. बी. (अण्णा) बंडगर, अतुल जोशी, अनंत सांगावकर, बी. एस. पाटील, आदी वकील व पक्षकार हजर होते.यावेळी बोलताना गडहिंग्लज बारचे अध्यक्ष सुधाकर पोवार, गारगोटी बारचे अ‍ॅड. संजय भोसले यांनी वकील व पक्षकारांचा मेळावा घेण्याच्या सूचना केल्या; तर विश्वास चुडमुंगे, इसाक समडोळे, हॉटेल संघाचे उज्ज्वल नागेशकर यांनी पक्षकारांना कमीत कमी पैशांत राहण्याची सोय कोल्हापुरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भागीरथी महिला संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनीही संघटनेतर्फे पाठिंबा व्यक्त केला. हॉटेल मालक संघाचे पदाधिकारी सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, उमेश राऊत व क्रांतिगुरू लहूजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय माळवी, अमोल कुरणे, अ‍ॅड. दत्ताजी कवाळे, अ‍ॅड. रणजित कवाळे, पूजा डेव्हलपर्सचे मालक व जैन श्रावक संघटनेचे पारस ओसवाल यांनीही पाठिंबा दिला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, सचिव अ‍ॅड. सुशांत गुडाळकर खंडपीठाविषयी महत्त्व पटवून देत उपस्थितांचे आभार मानले.----- सचिन

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर