शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:51 IST

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात नऊ  फुटाने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. तर परिसरात दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला बळीराजा आनंदात आहे.

ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढसंगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा 

नृसिंहवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात नऊ  फुटाने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. तर परिसरात दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला बळीराजा आनंदात आहे.वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरत असून शेतकरी वर्गाची नदीकाठच्या मोटारी काढण्याची व नदीकाठी असलेले गवत कापून घेणेची धांदल चालू आहे.कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला   जोरात  प्रवाह आहे.   दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी  मंदिर परिसरातील  नदीकाठचे  साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु केले आहे.

दरम्यान, प्रांत डॉ. खरात व तहसीलदार अपर्णा मोरे यांनी नृसिंहवाडी येथे भेट देऊन पाणी पातळीची पाहणी केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त व ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते उपस्थित होते.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्यविषयी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितलेकृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत नऊ फुटाने वाढ झाली असून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराजवळील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर मंदिराला नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे. (छाया : प्रशांत कोडणीकर)

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे