शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:50 IST

गोकुळची नफा, ठेवीत उच्चांकी वाढ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ला रोज १२३६ गावांतील ६३१६ दूध संस्थांच्या माध्यमातून दूध येते. बारा तालुक्यांतील सभासदांना प्रतिनिधित्व मिळत नाही. यासाठी संचालक मंडळाची संख्या २५ केली आहे. संघाने गेल्या चार वर्षांत दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करत कार्यक्षमतेचा नवा उच्चांक गाठला आहे. शेतकरी हित, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार या त्रिसूत्रीवर संघाने नफा व ठेवीत उच्चांकी वाढ केल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तत्परतेने दिली आहेत.डॉ. गोडबोले म्हणाले की, संघाचे दैनंदिन सरासरी दूध संकलन १२.२२ लाख लिटर होते. मागील चार वर्षांत हे संकलन ३.७२ लाख लिटरने वाढून १५.९४ लाख लिटर इतके झाले आहे. गतवर्षी उच्चांकी असे १८.६० लाख लिटर संकलन झाले आहे. चार वर्षांत संघाने सरासरी म्हैस दुधाला १२ रुपये, तर गाय दुधाला ६ रुपये दरवाढ दिली आहे. अशी दरवाढ आणि हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त अधिकचा दूध दर फरक देखील दिला असल्यामुळेच ‘गोकुळ’चे संकलन आणि संस्थांचा ‘गोकुळ’साठीचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ची प्रगतीआर्थिक वर्ष ठेवी ढोबळ नफा उलाढाल२०२३-२४  -  २४८ कोटी २०९ कोटी ३६७० कोटी२०२४-२५  -  ५१२ कोटी २१५ कोटी ३९६६ कोटी

आयकर परताव्याची ठेवीत गुंतवणूकसंघास २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५.७१ कोटी व २०२३-२४ मध्ये ५.८४ कोटी असे ३१.५५ कोटी आयकर परतावा स्वरूपात रक्कम मिळाली. ही रक्कम ठेवीत गुंतवणूक केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.

भोकरपाडा जमिनीचा व्यवहारच नाहीभोकरपाडा एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याने संघाला होणारा फायदा, होणारी गुंतवणूक या सर्वांचा अभ्यासही केला होता; पण तांत्रिक अडचणी आल्याने या जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही आणि व्यवहार न झाल्याने संघाने एकही रुपया येथे खर्च केलेला नसल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.

कोटेशननुसारच खरेदीसंघाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना जाजम व घड्याळ भेट दिले. त्यासाठी रीतसर कोटेशन घेऊन कमीत कमी दराने त्याची खरेदी केले. टप्प्याटप्प्याने बिल अदा केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.

ऑक्सिजन प्रकल्प सामाजिक बांधिलकी म्हणूनच..कोविडच्या काळात ऑक्सिजनसाठी लोक मृत्युमुखी पडत होते. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ‘गोकुळ’ने ४५.९६ लाखांचा प्रकल्प उभा केला. त्यातून ५६ हजार रुपयांची ऑक्सिजनची विक्री झाली. सुदैवाने कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी थांबल्याने हा प्रकल्प बंद आहे. उत्पन्नासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकल्पाची उभारणी केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.