शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona in belgoan- बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्ण, आकडा सव्वाशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:00 IST

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बागलकोट मधील ८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्णआकडा सव्वाशे पार

बेळगाव  : बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची आणखी ९ रुग्णांची वाढ झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बागलकोट मधील ८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नवीन ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. रामदुर्ग तालुक्यातील कल्लूर गावच्या सात महिन्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. रामदुर्ग तालुक्यात या लहान मुलीच्या माध्यमातून कोरोनाची एन्ट्री झाली आहे. ७ मे रोजी कोल्हापूरमधून आलेल्या कुटुंबाला बटकुरकी गावात क्वांरंटाइन करण्यात आले होते. या कुटुंबापैकी सात महिन्याच्या बाळाला कोरोना झाला आहे.झारखंड येथील सम्मेद शिखरजी येथील धार्मिक स्थळाला भेट देऊन आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा जडली आहे. यामध्ये ६५, ६३ आणि ७५ वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. दीड महिन्यापूर्वी १५ जणांच्या सोबत ते सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळी जाऊन आले होते. ६ मे पासून कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीमध्ये त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवले होते.

राजस्थानातील अजमेर येथून परत आलेल्या आणखी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहेत. बैलहोंगल तालुक्यातील संपगाव येथील २४ वर्षीय युवक आणि २५ वर्षीय युवक कोरोना पीडित आहेत. ८ मे पासून संपगाव हायस्कूलमध्ये अजमेर रिटर्न असलेले ८ जण संस्थात्मक अलगीकरणात होते. त्यातील हे दोघेजण आहेत.हिरेबागेवाडी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४३ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे हिरेबागेवाडीचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. मुंबई रिटर्न असलेल्या हुक्केरी येथील दोघांना कोरोना झाला आहे त्यामुळे मुंबई कनेक्शनमध्ये वाढ झाली आहे. बाहेरील राज्यातून आलेले ८ व प्रथमच संपर्कात आलेला एक जण असे ९ जण गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.बैलहोंगल कागवाड रामदुर्ग या तीन नवीन ठिकाणी जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरवले आहेत. बेळगावात ११९ तर बागलकोटचे बेळगावात उपचार घेत असलेले ८ असे मिळून १२७ कोरोनाचे रुग्ण सध्या बेळगावात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर