शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडाचा जागतिक वारसास्थळात समावेश हा अभिमानाचा क्षण - पालकमंत्री आबिटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:28 IST

कोणतेही निर्बंध अथवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत

पन्हाळा : पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा व सन्मानाचा क्षण आहे. भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये असलेले पन्हाळगडाचे महत्व व प्रेरणा नवीन पिढीला देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल त्यांनी पन्हाळगडास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शूरवीर बाजी प्रभू देशपांडे व नरवीर शिवाजी काशिद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. आबिटकर म्हणाले, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनामध्ये पन्हाळगडाचे एक वेगळे महत्त्व आहे. पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील रणसंग्राम, पन्हाळगडावरील छत्रपतींचे वास्तव्य इतिहासाला एक नवीन प्रेरणा व नवीन प्रेरणेचा जीवनपट उलगडून सांगणारा आहे. अशा पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे नवीन पिढीला पन्हाळगडाचे महत्व समजेल.कोणतेही निर्बंध अथवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीततसेच छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबण्यासाठी जगभरात त्यांचा आदर्श घेतील. कोणतीही गोष्ट नामांकित केली जाते, तेव्हा त्याचा फायदा स्थानिकांना, परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाच होतो. वारसा स्थळांच्या यादीतील समावेशाचा पर्यटन वाढीसाठी उपयोग होईल. कोणतेही निर्बंध अथवा चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. हे यापूर्वीही स्पष्ट केलेले आहे व पुढेही करू. पन्हाळगडावरील तटबंदी असो वा ऐतिहासिक वास्तू यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे -जाधव,मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, चैतन्य भोसले, माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, रामानंद गोसावी तसेच नागरिक, पालिका प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.