पाचगावात शिवसेना शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:52+5:302021-07-16T04:16:52+5:30

यावेळी पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. घर तिथे ...

Inauguration of Shiv Sena branch in Pachgaon | पाचगावात शिवसेना शाखेचे उद्घाटन

पाचगावात शिवसेना शाखेचे उद्घाटन

यावेळी पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. घर तिथे शिवसैनिक व गाव तिथे शाखा हे उद्दिष्ट घेऊन आम्ही कामाला लागलो आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विराज पाटील यांना सदस्य करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना मंजीत माने, तालुकाप्रमुख विराज पाटील अरुण अबदागिरी, विकी काटकर, अभी पोरे, संतोष ओतारी, रंजीत कोंडेकर, रोहन घोरपडे, रोहन भाटले, विशाल घराळे, सूरज आवळे, रवी पोद्दार, ओम डोणे उपस्थित होते.

फोटो : १५ पाचगाव शिवसेना

पाचगाव येथे शिवसेना शाखेच्या उद‌्घाटनप्रसंगी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विराज पाटील, सुजित चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Shiv Sena branch in Pachgaon