प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एम.आर. असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने मराठी शाळेमध्ये संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी, रॅपिड अँटिजन टेस्ट व ताप व इतर सर्व आजारांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यास त्यांना अतिग्रे येथील कोविड सेंटरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व विराचार्य संस्थेच्या दोन रुग्णवाहिकेच्या माध्यमातून भरती केले जाणार आहे. ही मोहीम ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, पोलीस पाटील नयन पाटील, सरचिटणीस मुनीर जमादार, तलाठी एस.ए. बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच संदीप चौगुले, माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच राहुल शेटे, हेरले एम.आर. असोसिएशनचे अध्यक्ष विशाल परमाज, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शीतल पाटील उपस्थित होते.