कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय अनिल मांडरेकर याने ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तर कसबा बावडा येथील सायली किरण भोसले हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. आदमापूर (ता. भुदरगड) येथील सतेज पाटील, राशिवडे बुद्रुक (ता.राधानगरी) सुशांत लाड, अजय तोडकर, तन्मय मांडरेकर, राहुल आपटे व सूरज डेबजे यांनी परीक्षेत यश संपादन केले. २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर एक हजार ५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. ३० ऑक्टोबरपर्यंत या मुलाखती घेऊन गुरुवारी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. सायली भोसले ही बावड्यातील नेजदार कॉलनीतील रहिवासी असून तिचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूरमधील म.ल.ग. हायस्कूलमध्ये झाले आहे. पुढे तिने पनवेलमधून ईएनटीसीमूधन इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. २०२० पासून ती राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत होती. काहीकाळ पुण्यात तिने खासगी शिकवणी लावून राज्यसेवेची तयारी केली. राज्यसेवा मुख्य परीक्षेत ती पात्र ठरल्यानंतर कोल्हापुरातील विद्याप्रबोधिनीमध्ये तिने मुलाखतीची तयारी केली. दुसऱ्याच प्रयत्नात सायलीने या परीक्षेत यश मिळवत राजपत्रित अधिकारी वर्ग-एकला गवसणी घातली आहे.सलग १२-१२ तास अभ्याससायलीचे वडील किरण भोसले हे सातारा येथे पोलिस निरीक्षक असून आई गृहिणी आहे. जीवनात अशक्य काहीच नाही, फक्त ते करण्याची तयारी असावी लागते. मी हेच तत्त्व पाळून सलग १२-१२ तास अभ्यास केल्याने या परीक्षेत यश मिळवू शकल्याचे सायलीने सांगितले.तन्मय मांडरेकर ओबीसीत राज्यात पहिलाइचलकरंजी येथील तन्मय अनिल मांडरेकर याने ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तन्मय याची आई अंगणवाडी सेविका आहे. तन्मय याने तिसऱ्या टर्ममध्ये हे यश मिळवले. तन्मय सध्या गटविकास अधिकारी म्हणून सेवा प्रशिक्षण घेत आहे. आईच्या कष्टाचे चीज झाल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या. कष्ट करण्याची तयारी आणि मनात यश मिळवण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कोणत्याही आव्हान पार करता येते, असे अनुभव त्याने सांगितले.बावड्यात निघाली मिरवणूकसायलीने या परीक्षेत यश मिळवताच कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तिची भगवा चौक ते नेजदार कॉलनी अशी मिरवणूक काढण्यात आली.क्लास न लावता सुशांतचे यशराशिवडे बुद्रुक (ता.राधानगरी) सुशांत साताप्पा लाड यांनीही या परीक्षेत यश मिळवले. राजाराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयातून पदवी घेतलेल्या सुशांतचे वडील शेतकरी असून आई शिलाई काम करते. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता त्यांनी या परीक्षेत यश मिळविले. सुशांत सध्या करनिरीक्षक म्हणून सेवेत आहेत. अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करत राहिल्यानेच हे यश मिळाल्याचे सुशांतने सांगितले.आदमापूरच्या सतेज पाटीलची निवडआदमापूर (ता. भुदरगड) येथील सतेज सुरेश पाटील यांनी ७५ वी रँक मिळवली. सतेज यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर टिक्केवाडी येथे माध्यमिक शिक्षण प.बा. पाटील विद्यालय मुदाळ येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथील कॉलेजमध्ये तर उच्च शिक्षण सोळांकूर येथील महाविद्यालयात झाले. आई-वडील दोघे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सतेजचे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न होते. अविरत मेहनत व कष्ट घेऊन सतेजने यश मिळवल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया आई-वडिलांनी दिली.
Web Summary : Tanmay Mandrekar topped OBC, Sayli Bhosle secured second among girls in MPSC exam. Other candidates, including Satej Patil and Sushant Lad, also achieved success. Hard work and perseverance were cited as key to their achievements.
Web Summary : तन्मय मांडरेकर ओबीसी में अव्वल, सायली भोसले एम.पी.एस.सी. परीक्षा में लड़कियों में दूसरे स्थान पर रहीं। सतेज पाटिल और सुशांत लाड सहित अन्य उम्मीदवारों ने भी सफलता प्राप्त की। उनकी उपलब्धियों के लिए कड़ी मेहनत और दृढ़ता को महत्वपूर्ण बताया गया।