शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शर्तभंग नियमित करण्यासाठी आता मंत्रालयात हेलपाटे, शेतकऱ्याची होणार कोंडी; शासनाचा उफराटा फतवा

By विश्वास पाटील | Updated: March 16, 2023 16:15 IST

राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना

विश्वास पाटीलकोल्हापूर : जमिनीचा शर्तभंग झाला असल्यास तो नियमित करण्यासाठी लोकांना आता थेट मंत्रालयातच हेलपाटे मारावे लागणार आहेत. कारण फेब्रुवारीपासून शासनाने नियमितीकरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून स्वत:कडे म्हणजे मंत्रालयात घेतले आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षाला सरासरी पाचशेहून अधिक प्रकरणे शर्तभंग नियमितीकरणाची असतात. त्यांना जिल्हा पातळीवरच मंजुरी मिळायला चार-सहा महिने लागतात. आता हा कालावधी वर्षाहून जास्त होणार आहे.राज्य सरकार लोकांच्या अडचणी कमी करण्यापेक्षा त्यात कशी भर घालते त्याचा हा आदेश म्हणजे उत्तम नमुना आहे. इनामी, देवस्थान, वतन,मुलकीपड आणि गावठाण जमिनीची मालकी शासनाकडे असते. त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हटले जाते; परंतु ज्यांच्याकडे या जमिनी कसायला असतात ते लोक विनापरवाना हस्तांतरण, वापरात बदल, पुनर्विकास, टीडीआर, एफएसआय, व अन्य स्वरुपात शर्तभंग करतात.

जमीन देताना शासनाने घातलेल्या अटी व शर्तीचा भंग म्हणजेच शर्तभंग. या जमिनीची खरेदी-विक्री करायची झाल्यास सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावे लागते. त्यावेळी रेडीरेकनरच्या २५ टक्के रक्कम भरून शर्तभंग नियमित करून दिला जात असे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३७ अ मधील नवीन तरतुदीनंतर आता असे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे व त्यांनी मंत्रालयात पाठवून द्यावेत असे आदेश महसूल विभागाने २४ फेब्रुवारी २०२३ ला काढले आहेत.तोंडाला फेस येणारया निर्णयाचा जास्त फटका छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्याची जमीन कमी आहे किंवा गायरानातील भूखंड आहे, पैशाची गरज आहे म्हणून तो तातडीने विकून आजारपण, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण यासाठी पैशाची तजवीज करू इच्छितो अशा शेतकऱ्यांची आता चांगलीच कोंडी होणार आहे.

जे बडे शेतकरी किंवा नोकरदार आहेत ते मंत्रालयात जाऊन त्याचा पाठपुरावा करू शकतील परंतु सामान्य शेतकऱ्याला जिल्हास्तरावरच हेलपाटे मारताना तोंडाला फेस येत होता. शिवाय राज्यभरातील सर्व प्रकरणे मंत्रालयात गेल्यावर तिथे किती विलंब लागेल याचा विचारच न केलेला बरा अशी स्थिती उद्भवणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMumbaiमुंबई