शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘लाचे’त पंटरच खास, ‘साहेबां’ना होत नाही त्रास

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 16, 2022 17:44 IST

तानाजी पोवार कोल्हापूर : सरकारी कामात लाच घेण्यासाठी अलीकडे बहुतांश विभागात खासगी व्यक्ती म्हणजेच पंटरचा वापर वाढल्याचे कारवाईवरून स्पष्ट ...

तानाजी पोवारकोल्हापूर : सरकारी कामात लाच घेण्यासाठी अलीकडे बहुतांश विभागात खासगी व्यक्ती म्हणजेच पंटरचा वापर वाढल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. पंटरद्वारे लाच घेतल्यास साहेबही सुरक्षितता अनुभवतो. गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२८ ठिकाणी सापळा लावून लाच घेणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यासह तब्बल १८२ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये तब्बल ६१ पंटरांचा समावेश आहे.

‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशी म्हणच समाजात रूढ आहे. काम थांबविण्यासाठी ‘लाच’ हेच रहस्य असते. लाच दिल्यानंतर झटक्यात काम पूर्ण होते हे सरकारी कार्यालयातील चित्र आहे. पण सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची असणारी करडी नजर असते. अलीकडच्या वाढत्या कारवाईमुळे अनेक जण सावधगिरी बाळगत पंटरद्वारे लाच घेतात. त्यामुळे साहेबही सुरक्षित अन वरकमाईही रग्गड होते. सरकारी कार्यालयातील या ‘फार्म्युला’मुळे पंटरना मात्र सुगीचे दिवस सुरू आहेत.

गेल्या साडेचार वर्षातील कारवाई

वर्ष :  यशस्वी सापळे - एकूण लाचखोर - खासगी व्यक्ती/पंटर२०१८ : ३४ - ४३ - १२२०१९ : ३१ - ४१ - १६२०२० : २७ - ४२ - १२२०२१ : २४ - ३८ - १४

सहा महिन्यात २१ लाचखोर सापडलेगेल्या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे लावून १२ ठिकाणी छापे टाकले, त्यात २१ लाचखोरांना गजाआड डांबण्यात यश आले. त्यामध्ये तीनच पंटरचा समावेश आहे.

लाचखोरीत पोलिसांची बाजी

२०१८ ते २०२१ या चार वर्षात लाचखोरीत महसूल विभागाने आपला नंबर जिल्ह्यात नेहमीच अव्वल राखला. पण २०२२ च्या सहा महिन्यात महसूल विभागाला मागे टाकत पोलीस विभागाने प्रथम क्रमांक गाठला. सहा महिन्यात पाच कारवाईत तब्बल सात पोलिसांना लाच घेताना ‘एसीबी’ने पकडले.

लाचेसाठी सरकारी काम आडविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी अगर टोल फ्री नं. १०६४ वर संपर्क साधा. लाचखोराला बेड्या ठोकू, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून काम पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न करु. - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरण