शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सीपीआरमध्ये दुचाकीवरील पोत्यात तलवार, दोघे गोत्यात, तिसरा कोण? कोडोलीतील दोघे ताब्यात

By भीमगोंड देसाई | Updated: January 19, 2024 23:06 IST

Kolhapur News: सीपीआरमधील अधिष्ठाता कक्षासमोरील दूधगंगा इमारतीसमोर तलवारीसह मिळालेली दुचाकी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीला तलवार अडकून तिघेजण सीपीआरच्या मुख्य प्रवेशव्दारातून प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.

- भीमगोंडा देसाई  कोल्हापूर - सीपीआरमधील अधिष्ठाता कक्षासमोरील दूधगंगा इमारतीसमोर तलवारीसह मिळालेली दुचाकी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीला तलवार अडकून तिघेजण सीपीआरच्या मुख्य प्रवेशव्दारातून प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. यामुळे पोलिस दुचाकीवरील तिसऱ्याचा शोध घेत आहेत. तलवार कशासाठी घेवून आले होते, काय उद्देश होता, कोणाचा गेम करण्याचा प्लॅन होता का ? या अंगाने पोलिस तपास करीत आहेत. सीपीआरमधील सुरक्षा रक्षक आणि दक्ष नागरिकामुळे वेळीच दुचाकी आणि तलवार पोलिसांना मिळाली.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सीपीआरच्या मुख्य प्रवेशव्दारातून दुपारी तीनच्या सुमारास तिघा तरुणांनी एकाच दुचाकीवरून प्रवेश केला. या दुचाकीला पांढऱ्या प्लॉस्टिकच्या पोत्यात तलवार होती. ही दुचाकी दूधगंगा इमारतीसमोर लावली. तेथील सुरक्षारक्षक आणि काही दक्ष नागरिकांना संशय आल्याने दुचाकीवरील पोत्याला हात लावून पाहिले. त्यावेळी त्यामध्ये तलवार असल्याचे समोर आले. काहीवेळातच बघ्यांची गर्दी झाली. म्हणून सुरक्षारक्षकाने तलवारीसह दुचाकी काही अंतरावर नेवून लावली. लक्ष्मीपुरी पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. पोलिस तातडीने येवून तलवारीसह दुचाकी जप्त केली.

दरम्यान, काही वेळानंतर दुचाकीवरील दोन तरूण दूधगंगा इमारतीसमोर आले. त्यांनी आपण लावलेल्या दुचाकीचा शोध घेवू लागले. त्यांना दुचाकी सापडेना. म्हणून ते दोघेही करवीर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद देण्यासाठी गेले. आधीच तिथे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगून ठेवल्यामुळे त्या दोघांना ताटकळत ठेवले. त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत तलवार कशासाठी आणली होती, हे स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर