पोपट पवारकोल्हापूर : एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून कौशल्याधारित शिक्षणाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याचे सरकारचे धोरण असले तरी शिवाजी विद्यापीठातील तब्बल १४ अधिविभागांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता कमालीची घटली असल्याचा अहवाल प्रवेश आढावा समितीनेच दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात १४ अधिविभागांत प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे वाढलेला कल, वर्षानुवर्षे प्राध्यापकांची रिक्त पदे यामुळे विद्यार्थीसंख्या घटत असल्याचा निष्कर्ष शिक्षणतज्ज्ञांकडून काढला जात आहे. कधी काळी विद्यापीठाच्या अधिविभागांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी रांगा लागायच्या, त्याच विद्यापीठात आता कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.शिवाजी विद्यापीठात ३७ अधिविभाग आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक यासह विविध अधिविभागांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या घटली आहे.का घटली विद्यार्थीसंख्याविद्यापीठात २०२३-२४ या वर्षात क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होण्याची कारणे समितीने दिली आहेत. त्यानुसार स्वायत्त महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढली, अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. विनानुदानित अभ्यासक्रमांच्या बाबतीत काही अभ्यासक्रम शासकीय शिष्यवृत्तीच्या यादीत नसल्याने अडचणी निर्माण येतात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवरील काही टप्पे प्रवेशाला अडथळा ठरतात, काही अभ्यासक्रमांची प्रसिद्धी राष्ट्रीयस्तरावर होत नाही, अशी कारणे प्रवेश आढावा समितीने दिली आहेत.
दृष्टीक्षेपात २०२३-२४ मधील विद्यार्थीसंख्याअधिविभाग - प्रवेशक्षमता - प्रवेशित विद्यार्थीजर्नालिझम विभाग बी. जे - ४० - १३जर्नालिझम विभाग एम. जे - ३० - १२एम. ए. मास कॉम - ३० - १६
अर्थशास्त्रविभाग - प्रवेशक्षमता - प्रवेशित विद्यार्थीबी. एस्सी., एम. एस्सी. इकॉनॉमिक्स - ४० - २१
केमिस्ट्रीअप्लायड केमिस्ट्री - ६० - १५फिजिकल केमिस्ट्री - २० - १८
सोशल ऑफ नॅनो सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीबी. एस्सी., एम. एस्सी. नॅनोसायन्स - ६० - ४२एम. एस्सी. नॅनोसायन्स - ३५ - १४
संगीत व नाट्यशास्त्रमास्टर ऑफ आर्टस- ड्रामॅटिक - १५ - ०७मास्टर ऑफ आर्टस- तबला - १५ - ०६
झूलॉजीमास्टर ऑफ सायन्स - ६० - ५५बॉटनीमास्टर ऑफ सायन्स - ५० - ४८इलेक्ट्रॉनिक्समास्टर ऑफ सायन्स - ३६ - ३०बायोकेमिस्ट्रीमेडिकल इन्फाॅर्मेशन मॅनेजमेंट - २० - १३
पर्यावरणशास्त्रमास्टर ऑफ सायन्स - ५० - ३७
मॅथेमॅटिक्सएम. एस्सी. मॅथेमॅटिक्स कम्पुटर सायन्स - ३० - ०७
हिंदीमास्टर ऑफ आर्टस - १५ - ११
यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हल्पमेंटविभाग - प्रवेशक्षमता - प्रवेशित विद्यार्थीएमबीए रुरल मॅनेजमेंट - ६० - ५५मास्टर ऑफ रुरल स्टडिज - ६० - २८मास्टर ऑफ सोशल वर्क - ६० - ४९मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी - १८ - १५