शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : योग्यवेळी पाण्याचा विसर्ग करून पूरनियंत्रण करणार मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील संभाव्य पूरनियंत्रणासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. ...

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांना कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करण्याचा व त्याआधारे पूर नियंत्रण करण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरनियंत्रण बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. तिन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.

मंत्री पाटील म्हणाले की, मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर, एकाचवेळी सर्व धरणांतील पाणी सोडले जाते. परिणामी महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे हा धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करावे. हवामान आणि पाऊस याचा अभ्यास करून धरणांमधील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे. मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करावीत. महापूर आल्यानंतर किती गावांतील किती लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन केले आहे; पण पूरस्थितीच निर्माण होणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.

खासदार संजय मंडलिक म्हणाले की, पावसाचे पाणी अडण्यासाठी अर्धवट पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाचे काम पूर्ण करावे. राधानगरी धरणाला सर्व्हिस गेट बसवावे. बैठकीत महापुरास पूररेषेतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा विषय चर्चेत आला. यावर मंत्री पाटील म्हणाले की, यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेऊन कार्यवाही करावी.

बैठकीच्या सुरुवातीलाच पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुन्हाले यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती दिली. ते म्हणाले की, कृष्णा खोऱ्यातील नद्यांची पाणीपातळी पावसाळ्यात त्या-त्या वेळी नेमकेपणाने कळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येईल. याद्वारे रियल टाईम डाटा अ‍ॅनॅलेसिस सिस्टिम आणि रियल टाईम डिसिजन सपोर्ट सिस्टिम कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे नद्यांमधील पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

बैठकीस आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रकाश आवाडे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध सूचना केल्या.

कर्नाटकात मोठे नुकसान

गेल्यावर्षी पूर टाळण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर समन्वय ठेवून अलमट्टीचा विसर्ग ५ लाख क्युसेकपर्यंत वाढवला. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस पूरस्थिती गंभीर झाली. तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. हाही मुद्दा या वेळी विचारात घ्यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री पाटील यांनी दिली.

फोटो : ३१०५२०२१- कोल- महापूर नियंत्रण बैठक-न्यू

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या संभाव्य पूरनियंत्रण पूर्वतयारी बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विविध सूचना दिल्या. या वेळी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. (फोटो : नसीर अत्तार)