शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सुधारित : गोकुळ सत्तारूढमधून कोण निसटणार हीच उत्सुकता; चौघांच्या भूमिकेकडे लक्ष : पॅनलच्या रचनेवरच ठरणार गुलालाची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनलमधून कोण ...

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनलमधून कोण निसटणार आणि विरोधी आघाडीला जाऊन मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. कारण त्यावरून या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे नाव त्यामध्ये प्राधान्याने घेतले जात आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याबद्दलही संभ्रम असला, तरी ते असा निर्णय घेतील का, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांनीही वेगळे ठराव दाखल केले होते आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे.

‘गोकुळ’च्या राजकारणात पाच ज्येष्ठ संचालकांकडे निर्णायक संख्येेने ठराव असल्याचे मानण्यात येते. त्यात सगळ्यात जास्त वाटा अर्थातच डोंगळे यांचा आहे. विधानसभा निवडणूक व त्या अगोदरही अध्यक्ष निवडीवरून त्यांचे संघाचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी वित्तुष्ट आले आहे. त्यामुळे त्यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडल्यात जमा आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले असल्याने ते विरोधी आघाडीबरोबरच राहतील, हे स्पष्टच आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेली पाच वर्षे ‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात रान उठवले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांची गट्टी आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात बेरजेचे राजकारण करायचे म्हणून ते ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ आघाडीबरोबर जातील, अशी शक्यता मध्यंतरी व्यक्त झाली; परंतु तसे घडण्याची शक्यता फारच धूसर आहे. कारण हे दोघेही राज्यातील सत्तारूढ आघाडीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन ‘गोकुळ’मध्ये पॅनल होत आहे म्हटल्यावरच वातावरण बदलून जाणार आहे. मुश्रीफ विरोधी आघाडीचे प्रमुख नेते असल्यावर आमदार राजेश पाटील सत्तारूढ गटाबरोबर राहण्याची शक्यता नाही. कारण त्यांना आमदार करण्यात मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शिवाय पक्ष सोडून ते बाजूला जाणार नाहीत. चंदगड तालुक्यात ‘गोकुळ’च्या मतांचे त्यांना मोठे पाठबळ असल्याने त्यांच्या निर्णयाला महत्त्व आहे. महाडिक व विश्वास नारायण पाटील यांच्या संबंधांमध्ये दरी निर्माण झाली असली तरी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळेच ते काय भूमिका घेतात, याचा अंदाज बांधणे अवघड असले, तरी ते डोंगळे यांच्यासोबत विरोधी पॅनलचा भाग होतील, अशीच शक्यता जास्त वाटते.

माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्याऐवजी त्यांचा मुलगा चेतन यावेळी उमेदवार असेल; परंतु मूळच्या नरके गटातही मतविभागणी होईल. अध्यक्ष रवींद्र आपटे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या पत्नी किंवा मुलगा सत्तारूढ पॅनलमधून असू शकतो. चुयेकर यांच्या पत्नी संचालिका जयश्री पाटील यांच्याऐवजी मुलगा शशिकांत हे रिंगणात असतील. गेल्या निवडणुकीत ते विरोधी आघाडीच्या सानिध्यात आले होते. रणजित पाटील सत्तारूढबरोबर राहणार असले, तरी इतर ज्येष्ठ संचालकांइतका मतांचा गठ्ठा त्यांच्याकडे नाही. उर्वरित संचालक हे सत्तारूढ गटाबरोबर राहतील.

विरोधी आघाडीलाही मर्यादा...

संघाचे एकूण मतदान ३,९०० आहे. त्यामध्ये ५००-६०० मतांची जोडणी असलेले एक-दोन विद्यमान संचालक विरोधी आघाडीला मिळाले तर निवडणुकीचे चित्रच पालटू शकते. विरोधी आघाडीनेही गेल्या पाच वर्षांत संभाव्य उमेदवारांची फळी तयार केली आहे. त्यात तीन पक्षांना संधी द्यायची झाल्यास सत्तारूढमधील किती लोकांना घ्यायचे, याचाही विचार विरोधी आघाडीला करावा लागणार आहे. सत्तारूढमधील कुणाला न घेताही पक्ष म्हणून सतेज-मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक हे एकदिलाने एकत्र आल्यास निवडणुकीत हवा निर्माण होऊ शकते.