शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

शांतीसागर महाराजांची जीवनशैली आत्मसात करा

By admin | Updated: June 13, 2017 01:04 IST

कुन्थुसागर महाराज : कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क --आळते : सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश पूर्वकालापासून मुनिसंघाने मानवजातीला दिला आहे. त्यामुळे जैन धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. आचार्य शांतीसागर महाराजांची आचार, विचार व जीवनशैली आत्मसात केल्यास मानवी जीवन समृद्ध होईल, असा संदेश गणाधिपती गणाधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांनी दिला. आळते (ता. हातकणंगले) येथील कुन्थुगिरी येथे जन्मोत्सव जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागर महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त दि. ८ जून ते ११ जून या चार दिवसांमध्ये कुंन्थुगिरी धर्म क्षेत्रावरती विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये ध्वजारोहण, महामस्तकाभिषेक, आरती, आराधन, दीपोत्सव, संगीत संध्या, गुरुपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी धार्मिक प्रवचनामध्ये आचार्य वैराग नंदी, आचार्य निश्चय सागरजी महाराज, आचार्य सुविधी सागरजी महाराज यांचे प्रवचन झाले. मानव जातीच्या कल्याणासाठी जैन धर्मातील सर्व साधूसंतांनी एकत्र येऊन जैन समाज एकसंध ठेवण्याचे काम भविष्यात केले पाहिजे, असा प्रवचनाचा सूर होता. गणाधिपती ऋणधराचार्य कुन्थुसागरजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने १०८ भक्तगणांनी रक्तदान केले. औरंगाबादचे महाजार भक्त संतोषजी पाटणी यांनी चार दिवस येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमासाठी माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे, आमदार सुजित मिणचेकर, पोलीस अधिकारी सतीश माने, जि. प. सदस्य अरुण इंगवले, सुभाष शेट्टी, माजी जि. प. अध्यक्ष नानासो गाठ, जि. प. सदस्या पद्माराणी पाटील, वंदना मगदूम, सुधाकर मणेर, संजय चौगुले, सुरेश मोघे, सुधीर पाटील, जयूदीदी, पूनम दीदी, दीपक पाटील, प्रमोद जनगोंडा, प्रमोद हावळे, शीतल बुरशे , मान्यवर उपस्थित होते. आळते (ता. हातकणंगले) येथील श्री क्षेत्र कुन्थुगिरी येथे जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गणाधिपती गणधराचार्य श्री कुन्थुसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.