शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दारू हातभट्ट्यांवर छापासत्र, अवैध दारू विक्रेते, हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:00 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगर व ग्रामीण भागांत गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील दारू हातभट्ट्यांवर छापासत्रअवैध दारू विक्रेते, हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगर व ग्रामीण भागांत गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर सामूहिक छापे टाकून कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसत्र सुरू केले आहे; त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि हद्दीतील पोलीस ठाणे यांनी कारवाईचा आराखडा आखला आहे. या मोहिमेत १५ निरीक्षक, २२ सहायक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस कर्मचारी, पाच स्ट्रायकिंग फोर्स सहभागी केले आहेत. या संपूर्ण कारवाईचा आढावा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख घेणार आहेत. कारवाई करण्याचा संदेश नियंत्रण विभागातून सर्व पोलीस ठाण्यांना दिला गेला आहे.या ठिकाणी आहेत दारू अड्डेभुदरगड तालुक्यामध्ये जकिनपेठ, देवकेवाडी, बोंगार्डेवाडी; राधानगरीमध्ये म्हासुर्ली, गवशी, पाटीलवाडी, हातकणंगले माणगाववाडी, आजरा, बहिरेवाडी; करवीरमध्ये म्हालसवडे, कणेरीवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी, राजेंद्रनगर, मोतीनगर, शिंगणापूर.मोरेवाडीतील हातभट्टी उद्ध्वस्तमोरेवाडी, मोतीनगर परिसरातील हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापे टाकून सात घरांतील तयार दारू, कच्चे रसायन, नवसागर असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. सात सिंटेक्स टाक्या, १५ बॅरेल, चार अ‍ॅल्युमिनिअम डबे, रबरी पाईप असा साठा नष्ट केला. राज्यशासनाचा महसूल चुकविण्यासाठी मोरेवाडीत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते. कारवाई कितीवेळा केली तरी पुन्हा या ठिकाणी भट्ट्या पेटल्या जातात.

शहापूर, इचलकरंजी देशी दारू साठ्यांवर छापा, एकास अटक, एक पसारशहापूर आर. के. नगर इचलकरंजी येथे देशी दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी छापा टाकून एकाला अटक केली. संशयित उत्तम शामराव पाटील (वय ३५, रा. सौंदलगा, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ५३ हजार किमतीचे देशी दारूचे १४ बॉक्स जप्त केले. संशयित रवी मिणेकर हा पसार झाला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू अड्ड्यांवर छापासत्र सुरू आहे. शहापूर इचलकरंजी येथे संशयित उत्तम पाटील व रवी मिणेकर यांच्याकडे देशी दारूचा साठा असल्याची माहिती हातकणंगलेचे भरारी पथकाचे निरीक्षक जयसिंग जाधव यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून ही कारवाई केली. 

 

 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर