शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’साठी मोठ्या गावांना येणार महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या यादीत चार तालुक्यांतील कार्यक्षेत्रांतील २१८ गावांपैकी ३२ गावांमध्ये ५०० हून अधिक सभासद आहेत. त्या गावांना आता महत्त्व प्राप्त होणार आहे.नेते व प्रमुख कार्यकर्ते या गावांवरती अधिक लक्ष केंद्रित करून आहेत. कार्यक्षेत्रातील कागल ...

लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रसिद्ध केलेल्या यादीत चार तालुक्यांतील कार्यक्षेत्रांतील २१८ गावांपैकी ३२ गावांमध्ये ५०० हून अधिक सभासद आहेत. त्या गावांना आता महत्त्व प्राप्त होणार आहे.नेते व प्रमुख कार्यकर्ते या गावांवरती अधिक लक्ष केंद्रित करून आहेत. कार्यक्षेत्रातील कागल तालुक्यातील बोरवडे गावात १७७६, राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे १६१८, करवीर तालुक्यातील निगवे खालसा १०९१, भुदरगड तालुक्यातील गारगोटीत ९०३ इतकी सर्वाधिक सभासद संख्या आहे. त्यामुळे उमेदवारी देतानासुद्धा या गावांना प्राधान्यक्रमाने नेतेमंडळींना विचार करावा लागणार आहे.बिद्री साखर कारखान्याची ५७ हजार ८०९ सभासदांची कच्ची यादी प्रसिद्ध झाली असून, कोणत्या गावात किती मते याची चाचपणी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. कारखान्याच्या गत पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्याने आपण मतदानास पात्र आहोत का? याची चाचपणी सुरू आहे. मागील निवडणुकीत एकूण ४७ हजार ८३८ सभासद होते. त्यानंतर झालेले व मतदानास पात्र नसलेले चार हजार ३३८ या सभासदांची मतदानात झालेली वाढ, त्याचप्रमाणे वाढीव सभासदांपैकी मतदानास पात्र ठरलेले चार हजार ७४३ असे एकूण ५७ हजार ८०९ मतदार पात्र ठरले आहेत.सहकारी साखर कारखानदारीमध्ये सर्वाधिक सभासद संख्या असलेला आणि चार तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असलेला हा साखर कारखाना प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे घेऊनच निवडणूक लढलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक सभासद असलेल्या गावांचाच विचार करून राजकीय बेरजेसाठी आकडेमोड करताना दिसून येत आहेत.सध्या प्राप्त यादीनुसार राधानगरी तालुक्यातील ४६ गावांमध्ये १८ हजार १५९ सभासद संख्या, त्यामध्ये गट क्रमांक १ मधील ३२ गावांमध्ये ९ हजार ५४४ व गट क्रमांक २ मध्ये १४ गावांमध्ये ८ हजार ६२५ सभासद संख्या आहे. कागल तालुक्यातील ४५ गावांमध्ये १५ हजार १६९ सभासद असून, गट क्रमांक तीनमधील १७ गावांत ८५०, तर गट क्रमांक चारमधील २६ गावांत ७११९ सभासद आहेत. भुदरगड तालुक्यातील १०९ गावांमध्ये २० हजार ९५९ सभासद असून, गट क्रमांक पाचमधील ५५ गावांत १२ हजार ८९४, तर गट क्रमांक सहामधील ५४ गावांत आठ हजार ६५ सभासद आहेत. तसेच करवीर तालुक्यातील गट क्रमांक सातमधील सात गावांमध्ये ३५१२ सभासद आहेत. तसेच चार तालुक्यांतील सात गटांमध्ये ५७ हजार ८०९ सभासद आहेत. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक कमी पाटपन्हाळा येथे १९ सभासद, कागल तालुक्यातील पिराचीवाडीत ५१ सभासद, भुदरगड तालुक्यातील गडबिद्रीत दोन सभासद, तर करवीर तालुक्यातील इस्पुर्लीमध्ये १३ सभासद आहेत.पाचशेपेक्षा अधिक सभासद असलेली गावेराधानगरी तालुका :कसबा वाळवे (१६१६), सरवडे (१५८८), तुरंबे (१०३२), नरतवडे (९१५), कपिलेश्वर (८३१), सोळांकूर (७४५), अर्जुनवाडा (७१३), मांगोली (७००), आकनूर (६८२), तिटवे (६५५), कासारपुतळे (६१९), चंद्रे (५५२), मजरे कासारवाडा (५०८).भुदरगड तालुका :गारगोटी (९०३), मडिलगे बुद्रुक (८९२), मुदाळ (७६९), वाघापूर (७५६), म्हसवे (७६२), आकुर्डे (६०७), गंगापूर (६०७), पुष्पनगर (५६७), कूर (५४५).कागल तालुका: बोरवडे (१७७६), मुरगूड (१०५७), बेलवळे बुद्रुक (७६०), बिद्री (७५५), निढोरी (६००), वाळवे खुर्द (५६१), बानगे (५७४).करवीर तालुका : निगवे खालसा (१०९१), खेबवडे (६३५), चुये (५२३).