शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे देणार, कल्याणकारी योजना राबवा : सारवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:20 IST

कोल्हापूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची राहती घरे नावावर करून द्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनास दिले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देसफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे देणारकल्याणकारी योजना राबवा : सारवान

कोल्हापूर : शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची राहती घरे नावावर करून द्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिका प्रशासनास दिले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी महानगरपालिकेस भेट देऊन तेथील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, कामातील अडचणी, रिक्तपदे, पदोन्नती, घरे, वेतन व भत्ते या अनुषंगाने प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच त्यावर चर्चा केली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी झालेल्या चर्चेतून सफाई कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यात तसेच त्यांना मोफत घरे देण्यास, पदोन्नती देण्यास अडचणी असल्याची बाब निदर्शनास आली. त्यावेळी आयोगाच्या अध्यक्षांनी तातडीने रिक्त पदे भरा तसेच ती लोकसंख्येच्या तुलनेत भरा, त्यांना राहती घरे त्यांच्या नावावर करून द्या, असे निर्देश दिले.महापालिकेत रिक्त असलेली आठ रिक्त पदे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार १००० लोकसंख्ये मागे पाच कर्मचारी नेमणुकीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.आयोगाचे अध्यक्ष सारवान यांनी हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळते का, लाड कमिटीच्या शिफारशी लागू आहेत का, कर्मचाऱ्यांना वाहनभत्ता, गणवेश, धुलाईभत्ता दिला जातो का, याची खात्री करून घेतली. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही या सुविधा दिल्या जात असल्याचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, लेखा परीक्षक संजय सरनाईक उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी प्रभारी महापौर संजय मोहिते, स्थायी सभापती संदीप कवाळे उपस्थित होते. गीता सोनवाल, रिना टिंबोळे, भारती वालेकर यांचा आयोगातर्फे सत्कार करण्यात आला.

चारशे रुपये दुलाई भत्ता द्या!सारवान यांनी धुलाईभत्ता मिळतो का असे सर्व कर्मचाऱ्यांना विचारले तेव्हा तो मिळतो एवढेच सांगितले, पण तो किती मिळतो सांगितले नाही. चौकशी करता तो प्रति महिना ५० रुपये मिळत असल्याची बाब निदर्शनास आली. तेव्हा अध्यक्ष सारवान यांनी तत्काळ ४०० रुपये धुलाई भत्ता सुरूकरा, असे निर्देश दिले. आयुक्तांनी ही बाब मान्य केली.शासन निर्णयानुसार घरे द्याआयोगाची बैठक सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आयोगाचे अध्यक्ष सारवान यांची भेट घेऊन फिरंगाई परिसरातील कामगार चाळीतील सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने राहती घरे मोफत द्यावीत, अशी मागणी केली. शासन अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, पैसे भरण्याची सक्ती केली जाते, ती रद्द करावी अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंगवले यांनी दिला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर