शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालकांसाठीच्या योजना सक्षमपणे राबवा  :जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:45 IST

women and child development Collcator Kolhapur-महिला आणि बालकांसाठीअसणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांकरिता जेंडर बजेट प्रमाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी या विभागातील अधिकाऱ्यांना बजावले.

ठळक मुद्देमहिला व बालकांसाठीच्या योजना सक्षमपणे राबवा  :जिल्हाधिकारी दौलत देसाई महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत सुचना

कोल्हापूर : महिला आणि बालकांसाठीअसणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांकरिता जेंडर बजेट प्रमाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी या विभागातील अधिकाऱ्यांना बजावले.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, परिविक्षा अधिकारी बी.जी.काटकर, महिला व बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिता नाशिककर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी म्हणाले, स्वतंत्रपणे प्रत्येक विभागाने महिला सक्षमीकरणासाठी काय केले आहे याची माहिती घ्यावी. काय करणे अपेक्षित आहे याबाबत पत्रक पाठवावे. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.यावेळी हुंडा पध्दतीच्या विरोधात जनजागृती व सहाय्य संबधाने करण्यात आलेली कार्यवाही, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंमलबजावणीबाबतची कार्यवाही, महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी समुदाय यांच्या सामाजिक समावेशनासाठी करण्यात आलेली कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, शशिकला बोरा, डॉ. प्रमिला जरग, सुनिता गाठ, अर्चना प्रार्थरे, प्रिती घाटोळे उपस्थित होत्या.

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर