शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इम्पाला, रशियन ट्रॅक्टर, प्रिमियर पद्मिनी; व्हिन्टेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी

By संदीप आडनाईक | Updated: February 3, 2024 18:21 IST

कोल्हापूर : डाव्या बाजूने उघडणारा दरवाजा, लेफ्ट हॅन्डेड ड्रायव्हर अशी वैशिष्ट्य असलेल्या १९५७ मधील शेवरलेट कंपनीची इम्पाला, रशियन ट्रॅक्टर, ...

कोल्हापूर : डाव्या बाजूने उघडणारा दरवाजा, लेफ्ट हॅन्डेड ड्रायव्हर अशी वैशिष्ट्य असलेल्या १९५७ मधील शेवरलेट कंपनीची इम्पाला, रशियन ट्रॅक्टर, प्रिमियर पद्मिनी, जीप, मारुती सुझूकीच्या क्लासिक आणि व्हिन्टेज गाड्या पाहण्यासाठी तरुणाईने कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाचे आवारात गर्दी केली होती. पहिल्याच वर्षी भरवण्यात आलेल्या या वाहन प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महावीर महाविद्यालयात बी व्होक ऑटोमाेबाईल विभागाच्या चौथ्या बॅचने आयोजित केलेल्या ऑटोमेनिया २०२४ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी घाटगे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. के. ए. कापसे होते. यावेळी प्रा. सूरज शिंदे, प्रा. उत्कर्ष पाटणकर, प्रा. अमिन सदलगे, कोल्हापूर व्हिंटेज ओनर्स क्लबचे शंतनू जाधव, विक्रम जाधव, तेज बाईक्सचे तेजराज पाटील, रोहित इंगळे उपस्थित होते. जावेद मिस्त्री यांनी सूत्रसंचालन केले.या प्रदर्शनात व्हिंटेज गाड्यांचा संग्रह असणाऱ्या पाच क्लबचा समावेश होता. याशिवाय चारचाकी विक्रीचे ८, दुचाकी विक्रीचे ९ स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. याशिवाय बॅटरी ऑपरेटेड सायकल आणि व्हिंटेज तिचाकीसह १० सायकल्स, १० चारचाकी, ४० दुचाकीचा समावेश आहे.रशियन ट्रॅक्टर, इम्पाला गाडीचे विशेष आकर्षणया प्रदर्शनात रशियन शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या रशियन ट्रॅक्टर विशेष आकर्षण ठरले. याशिवाय तेज घाटगे यांची इम्पाला गाडी, अम्बॅसिडर गाडीभोवती तरुणांचा गराडा पडला होता. यातील अनेक जुन्या गाड्या खराब झाल्यानंतर त्याची दुरुस्ती करुन मॉडिफाईड आणि रिस्टोअर करुन पुन्हा चालू करण्याची किमया व्हिंटेज ओनर्स क्लबच्या मेस्त्रींनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर