शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायदा तत्काळ मागे घ्या, महाविकास आघाडी, डाव्या पक्ष संघटनांची कोल्हापुरात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:07 IST

शासनच महाराष्ट्र अशांत करतेय..

कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकती डावलून महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा कायदा आंदोलनकर्त्या जनतेची मुस्कटदाबी करणारा आहे. घटनेने दिलेले मुलभूत अधिकार नाकारणारा असून तो लोकशाही विरोधी आहे. तो तत्काळ मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडी व डाव्या पक्ष संघटनांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबतचे निवेदन दिले. आमदार पाटील म्हणाले, शासनाने बहुमताचा गैरवापर करून हा कायदा केला आहे. यामागे नक्षलवादाचे कारण दाखविले जात आहे. नक्षलवाद संपावा ही आमची देखील इच्छा आहे त्यासाठी कायद्यात बदल करावा. जनसुरक्षा कायदा करून सामाजिक संघटनांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाचे मत झाले असेल तर एखादी संघटना बेकायदेशीर असल्याचे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केले जाणार आहे. आमचा या कायद्याला विरोध असून हा कायदा रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे.यावेळी विजय देवणे, भरत रसाळे, व्ही. बी. पाटील, संपत देसाई, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, संजय चौगुले, वैभव उगळे, उदय नारकर, संदीप देसाई, सुभाष देसाई, सचिन चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, संदीप मोहिते, वैशाली महाडिक, किशोर खानविलकर, विवेकानंद गोडसे, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, अनिल घाटगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनच महाराष्ट्र अशांत करतेय..आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्र हित हे आत्ताच्या सरकारचे उद्देश नाही. यांचा अजेंडा फक्त नागरिकांना अडचणीत आणायचा आहे. शक्तिपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, आरक्षणाचा संभ्रम अशा गोष्टीतून सरकारच महाराष्ट्राला अशांत करत आहेत.

लोकशाही अबाधित राखण्याचे आव्हाननेपाळमधील घटनेचा संदर्भ देत पाटील म्हणाले, भ्रष्टाचार, राेजगार, महागाई या प्रश्नांवरून नेपाळमध्ये उद्रेक झाला. भविष्यात या बाबींवर उपाययोजना करून लोकशाही अबाधित राखण्याचे आव्हान सरकारपुढे असणार आहे.