शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात तुर्तातुर्त मनाई, प्रकरणाला नवे वळण

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 2, 2023 19:25 IST

दिवाणी न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर : कोल्हापुरच्या सिनेसृष्टीची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणात दिवंगत लता मंगेशकर यांचा महालक्ष्मी स्टुडिओच्या आधी लालचंद छाबरीया यांच्याशी व्यवहार झाला आहे. त्या आधारे दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर कोल्हापूर यांनी महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी यांनी या मिळकतीचे स्वरुप बदलू नये, त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण करू नये अगर ती मिळकत विक्री करू नये अशी दाव्याच्या निकालापर्यंत तुर्तातूर्त मनाई ताकीद २७ नोव्हेंबरला दिली आहे. त्यामुळे आता स्टुडिओ शासनाकडे हस्तांरित करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे.या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी, दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २०१९ साली लालचंद परशराम छाबरिया यांच्याशी जयप्रभा स्टुडिओबाबत तोंडी करार करून २ कोटी रुपये खात्यावर पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर पुढील ॲग्रीमेंट होणार होते, त्यानुसार छाबरिया यांनी त्यांच्या खात्यावर आरटीजीएसने २ कोटी ३० लाख रुपये पाठवले, मात्र त्यानंतर लता मंगेशकर आजारी पडल्या. दरम्यान कोरोना काळात लतादिदी व कुटूंबियांनी महालक्ष्मी स्टुडिओज एलएपी यांना जयप्रभा स्टुडिओ विकला. लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर छाबरिया यांना स्टुडिओची विक्री झाल्याचे कळाले. त्यानंतर २४ मार्च रोजी त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन २७ नोव्हेंबरला न्यायालयाने हा तुर्तातुर्त मनाई आदेश केला आहे. छाबरिया यांच्यावतीने ॲड. अरविंद मेहता यांनी कामकाज पाहिले. या आदेशामुळे स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर