कोल्हापूर : शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नरनजीक एका इमारतीच्या आडोशास एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांत गॅस भरत असल्याच्या संशयावरुन जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एकाला ताब्यात घेतले, त्याच्या ताब्यातून इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर, स्वयंपाक गॅसचे सिलिंडर असा सुमारे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.साकोली कॉर्नरनजीक श्रीधर रेसिडेन्सी इमारतीच्या आडोशाला एका पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनातील गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून दीपक दत्ता कांबळे (वय ३०, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले.
वाहनात बेकायदेशीर गॅस भरताना छापा, तरुण ताब्यात : सिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:46 IST
Crimenews Kolhapur : शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नरनजीक एका इमारतीच्या आडोशास एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांत गॅस भरत असल्याच्या संशयावरुन जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला.
वाहनात बेकायदेशीर गॅस भरताना छापा, तरुण ताब्यात : सिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त
ठळक मुद्देवाहनात बेकायदेशीर गॅस भरताना छापा, तरुण ताब्यात सिलिंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त