शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: जोतिबा डोंगरावरील रस्त्यावर बेकायदा खुदाई, कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:04 IST

नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

कोल्हापूर : मौजेवाडी रत्नागिरी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने लादे-डबाणे गल्लीतील घरांची बेकायदा पाडापाडी करून ग्रामस्थांचे नुकसान केले आहे, तसेच सिमेंटचे पाइप टाकण्यासाठी प्रशासनाची मान्यता न घेता रस्त्याची खुदाई केली आहे. तरी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.गोरखनाथ बुणे, सोमनाथ लवाळे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना याबाबतचे निवेदन दिले. सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगळे, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर, अरुण शिंगे यांनी संगनमताने जेसीबीच्या साह्याने घरांची पाडापाडी केली. गल्लीच्या दोन्ही बाजूला बेकायदा रस्त्याची खुदाई करून विनापरवाना सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नाही. निविदा प्रक्रिया राबवली नाही. नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. तसेच आर्थिक लाभातून सरकारी मालकीच्या गट नं ७ ब मधील पाण्याच्या टाकीशेजारी मोबाइल कंपनीचा टॉवर उभारला आहे. त्यासाठीही परवानगी घेतली गेली नाही. ग्रामपंचायतीच्या बैठकीत ठराव झाला नाही. तरी या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा