शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

दाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:20 IST

राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद्र शोधावे लागणार आहे.

ठळक मुद्देदाजीपूरमध्ये पार्टी केल्यास तुरुंगाची हवा, वन विभागाचे आदेश३१ डिसेंबरला अतिउत्साहींवर होणार कारवाई : रात्रभर राहणार गस्त

कोल्हापूर : राधानगरी, दाजीपूरमध्ये ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी गेल्यास आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वन विभागाने रात्रगस्त करीत दक्ष राहण्याचे आदेश राधानगरीचे वनसंरक्षक यांना दिले आहेत. त्यामुळे पर्यटकांना यंदा ३१ डिसेंबरला राधानगरीऐवजी दुसरे पर्यटन केंद्र शोधावे लागणार आहे.गेल्या महिन्यापासून ३१ डिसेंबरचा बेत आखण्याचे सुरू आहे. गोवा, पन्हाळा, विशाळगड अशा ठिकाणांवर चर्चा सुरू आहे; तर काहींनी आपण पार्टी करायची, निसर्गातील मस्त ठिकाणी जाऊन चुलीवर जेवण करायचे असाही बेत आखला आहे.

पण सावधान! चुकूनही या वर्षी राधानगरी वन्यजीव परिक्षेत्रामध्ये ३१ डिसेंबर रोजी पार्टी करण्यास जाऊ नका. वन्यजीव विभाग व स्थानिक पोलीस, ग्रामस्थ यांच्या वतीने गस्तीपथके तयार करण्यात आली असून, या काळात धरणक्षेत्रात, बॅकवॉटर आणि जंगल क्षेत्रात जेवणावळी करणाऱ्यांवर वन्यजीव कायदा व पोलीस कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे नोंद होणार आहेत.प्लास्टिक वापरणाऱ्यांवर जाग्यावर दंडदाजीपूर जंगल परिसरात जेवणावळी व प्लास्टिक टाकणाºयांवर जागेवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षाला तुरुंगाची हवा खावी लागू नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.करडी नजर असणारा परिसरराधानगरी ते दाजीपूर आणि दाजीपूर ते राऊतवाडी धबधबा या मार्गावर व राधानगरी ते काळम्मावाडी धरण या मार्गावर पोलीस, वन्यजीव खात्याची करडी नजर असणार आहे. 

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीkolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी