शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्यास मुंबईत उपोषण : चंदगड ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:23 IST

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी आज, मंगळवारी येथे दिला.चंदगड येथील रवळनाथ सभागृहात ग्रामस्थांची बैठक झाली

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम

चंदगड : चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी आज, मंगळवारी येथे दिला.चंदगड येथील रवळनाथ सभागृहात ग्रामस्थांची बैठक झाली

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ, असे सांगितले, तर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे लेखी शिफारस पत्र आल्यानंतर महिनाभरात नगरपंचायतीचा दर्जा देऊ, असे नगरविकास खात्याचे श्री. मोघे यांनी सांगितले. यावरून चंदगडला नगरपंचायत देण्यासंदर्भात शासनामध्येच एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री एक सांगतात व नगरविकास खात्याचे अधिकारी एक सांगतात. त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रश्नावरून चंदगडकरांना शासन खेळवत आहे की काय? अशी शंका आज ग्रामस्थांनी उपस्थित केली. बैठकीत ग्रामस्थांनी आचारसंहिता संपेपर्यंत नगरपंचायतीचा दर्जा शासन देते काय याची वाट पाहू अन्यथा मुंबईत मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा करू. त्यांनी सकारात्मक निर्णय दिला नाही तर आझाद मैदानावर सर्व ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा दिला व चंदगड ग्रामपंचायतीसह येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा टाकण्याचा निर्णय कायम ठेवला.

यावेळी भाजप जिल्हा युवा उपाध्यक्ष समीर पिळणकर, सुरेश सातवणेकर, बाबूराव हळदणकर, चंद्रकांत दाणी, तजमुल फणीबंद, माजी सरपंच अरुण पिळणकर, आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी भास्कर कामत, हिरामणी हुंबरवाडी, दिलावर सय्यद, मनोज चंदगडकर, भाजप चंदगड शहराध्यक्ष योगेश कुडतरकर, आदी उपस्थित होते.चंदगडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नकाकृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुबरवाडी यांनी स्वागत करून चंदगड ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये, चंदगडकरांची एकी अभेद्य आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रस्तावामध्ये त्रुटी न काढता ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अन्यथा इथून पुढे होणाºया तीव्र आंदोलनाला शासन जबाबदार राहील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी आचारसहिता संपेपर्यंत शासनाच्या निर्णयाची वाट पाहू अन्यथा चंदगडकरांच्या एकीचे दर्शन शासनाला आझाद मैदानावरच देऊ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप