शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संमतीपत्राच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर याद राखा; स्वाभिमानीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 21:05 IST

कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून समंती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर याद स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे. असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देसमंतीपत्राच्या आडून फसवणूक कराल तर याद राखा : स्वाभिमानीचा इशारासंतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून भिरकावली

कोल्हापूर: कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून संमती पत्राच्या आडून फसवणूक कराल, तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा देत संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून संमती पत्रे घेऊन एफआरपी दोन-तीन टप्यात सप्टेंबरपर्यंत देण्यासाठी कायद्याने बांधून घेतले आहे. त्याबाबत सोमवारी लोकमतने वस्तूस्थिती मांडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून त्याचा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांची भेट घेऊन संमती पत्राच्या आडून एफआरपीचे तुकडे पाडू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.सागर शंभूशेट्टे म्हणाले, वारणा कारखान्याने मागील एफआरपी दिली नसताना गेल्या वर्षी गाळप परवाना दिला कसा? शेतकऱ्यांनाच तेवढे कायदा आणि कारखानदार मोकाट फिरणार असतील तर याद राखा, गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशारा वैभव कांबळे व रंगराव पाटील यांनी दिला. याच दरम्यान, सागर शंभूशेट्टे यांनी निवेदन फाडून कार्यालयात भिरकावल्याने वातावरण तणावपुर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले.यावर, जबरदस्तीने कोणाला समंती पत्रे घेता येणार नाहीत. असे कोण करत असेल व नोंद किंवा ऊस तोडीबाबत अडवणूक करत असेल तर साखर सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक साखर सहसंचालक एन. आर. निकम यांनी सांगितले. यावेळी साखर उपसंचालक एस. एन. जाधव, सहकार श्रेणी अधिकारी-१ रमेश बारडे उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना