शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

Maharashtra Karnataka Border Dispute: 'धमक असेल तर सीमाबांधवांच्या मेळाव्याला बेळगावात या'

By समीर देशपांडे | Updated: December 10, 2022 19:48 IST

माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांचे राज्य शासनाला आव्हान

कोल्हापूर कर्नाटकातील सीमाबांधवांनी १९ डिसेंबरला बेळगावमध्ये मेळावा ठेवला आहे. आम्ही या मेळाव्याला जाणार आहेात. जर तुमच्यात धमक असेल तर या मेळाव्याला तुम्हीपण या असे जाहीर आव्हान माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाला दिले. महाविकास आघाडीच्यावतीने कर्नाटक शासनाच्याविरोधातील आंदोलनावेळी मुश्रीफ बोलत होते. सुमारे तीन तास चालेल्या या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. मुश्रीफ म्हणाले, कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्याने भावनिक वातावरण करण्यासाठी महाराष्ट्राला डिवचण्याचे काम सुरू आहे. आमचे दोन्ही समन्वय मंत्री घाबरून बेळगावला गेलेले नाहीत. ज्या दिवशी कर्नाटकचे अधिवेशन आहे त्याच दिवशी सीमाबांधवांचा महामेळावा आहे. त्यामुळे धमक असली तर मंत्र्यांनी तिथे यावे. ..त्याचाच हा एक भाग माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची लढाई सुरू असताना जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. भाजपकडून इतिहास पुसायचे काम सुरू असून त्याचाच हा एक भाग आहे. परंतू आम्ही सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे आहोत. ते दिल्लीचे डोके शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, बोम्मई आज जे बोलत आहे ते त्याचे डोके नाही. ते दिल्लीचे डोके आहे. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार मनोहर किणीकर, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. दिलीप पवार, प्रा. टी. एस. पाटील, वसंतराव मुळीक यांची भाषणे झाली. यावेळी आमदार पी एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकHasan Mushrifहसन मुश्रीफEknath Shindeएकनाथ शिंदे