शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा

By राजाराम लोंढे | Updated: February 28, 2023 15:22 IST

महावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला

कोल्हापूर : महापूर, कोरोना नंतर महागड्या खतामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आतामहावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला आहे. या दरवाढीला शेतकऱ्यांचा विरोध असून त्यातूनही शेतकऱ्यांच्या माथी दरवाढ मारली तर रस्त्यावरची लढाईल अटळ असल्याचा इशारा माजी आमदार संजय घाटगे यांनी दिला. महावितरणच्या वतीने वीज दरवाढीबाबत सुनावणीची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर दरवाढ लागू करण्याबाबत हालचाली असून त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने मंगळवारी महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. त्यावेळी घाटगे बोलत होते. इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, अगोदरच शेती आतबट्यात आली असताना त्या महावितरणने शेतकऱ्यांना दरवाढीच्या माध्यमातून शॉक देण्याची तयारी केली आहे. हे कदापी खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाचा विचार करुन सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा सवलतीचा कृषी पंप वीज दर किमान २०२५ पर्यंत कायम ठेवावा. यावेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने, व्यंकाप्पा भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले.दरवाढी करु नये या मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना देण्यात आले. प्रताप होगाडे, भारत पाटील-भुयेकर, ‘कुंभी’चे संचालक संजय पाटील-खुपीरेकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणelectricityवीज