शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- अनधिकृत मदरशावर कारवाई: अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाला दिलेला शब्द पाळावा, अन्यथा..

By भीमगोंड देसाई | Updated: February 1, 2024 17:30 IST

गणी आजरेकर, कादर मलबारी यांचा इशारा 

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील मदरशाचे बांधकाम मुस्लिम समाजाने स्वतःहून उतरून घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेतील शब्द पाळून प्रामाणिकपणे पाळला. मात्र मदरशाचे बांधकाम पुन्हा रीतसर परवानगी देऊन न केल्यास आणि जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेला शब्द नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी न पाळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन समाजाला सोबत घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांनी गुरूवारी प्रसिध्दी पत्रकातून दिला.पत्रकात म्हटले आहे, गेल्या २५ वर्षापासून स्व - मालकीच्या जागेवर असलेल्या मदरशाच्या बांधकामासंबंधी काही हिंदुत्ववादी संघटनानी तक्रार केली. यावरून महापालिकेच्या नगररचना विभाग केवळ कागदपत्रे अपुरी असल्याच्या कारणावरून बांधकाम बेकायदेशीर ठरवत कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ही कागदपत्रे पूर्ण करून एका महिन्याच्या आत पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत. त्यानंतर रीतसर या मस्जिदच्या बांधकामाला परवानगी देऊ असे ठोस आश्वासन महसूली कागदपत्रावर हात ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी मुस्लिम समाजाला दिला. यामुळे मुस्लिम समाज जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत मदरशाचे बांधकाम उतरून घेतले.

म्हणून मुस्लिम समाजाचे सहकार्यजिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहून सर्व धर्मीयांत सलोखा, बंधुभाव रहावा म्हणून मुस्लिम समाजाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आजरेकर, मलबारी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम